इतिहास परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इतिहास परिषद
इतिहास परिषद

इतिहास परिषद

sakal_logo
By

डॉ. उमेश कदम
आज कोल्हापुरात
कोल्हापूर ः केंद्र सरकारच्या शिक्षण विभागांर्तगत भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे सदस्य सचिव कोल्हापूरचे सुपुत्र डॉ. उमेश कदम शुक्रवारी (ता. २) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या समवेत बैठक होणार आहे. विद्यापीठातील छत्रपती शाहू महाराज सेंटर ऑफ स्टडीज फॉर मराठा हिस्‍ट्री या केंद्रात मोडी लिपीतील कागदपत्र आहेत. त्यातून इतिहासातील नवे मुद्दे संशोधनासाठी पुढे येतील. यावर चर्चा होईल. डॉ. कदम यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ही अधिष्ठातापद भूषविले आहे. मराठा साम्राज्याविषयी देश-विदेशात त्यांची व्याख्यानेही झाली आहेत. मराठा व फ्रेंच यांच्या संबंधावर आधारित त्यांचे पुस्तक लोकप्रिय ठरले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92496 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..