दीड दिवसाचा गणपती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीड दिवसाचा गणपती
दीड दिवसाचा गणपती

दीड दिवसाचा गणपती

sakal_logo
By

47097

दीड दिवसाच्या बाप्पांचे
पर्यावरणपूरक विसर्जन

२५ कुंडांत २५४ मूर्ती विसर्जित

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः शहरासह जिल्ह्यात आज दीड दिवसाच्या गणपतींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन झाले. महापालिकेने चार विभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात २५ विसर्जन कुंड ठेवले होते. तिथे २५४ मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित केल्या. येथे निर्माल्यही स्वीकारले.
महापालिकेने शहरात विविध प्रभागांत ठिकठिकाणी तसेच विहिरी, तलाव, नदीच्या परिसरात कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था केली होती. पर्यावरणपूरक विसर्जन करण्यावर नागरिकांचा ओढा असल्याने आज सकाळपासून या कुंडात दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन सुरू झाले. अनेक नागरिक सहकुटुंब जात होते. तिथे आरती केल्यानंतर निर्माल्य बाजूला ठेवून कुंडात गणरायांचे विसर्जन केले. गांधी मैदान विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पाच कुंड ठेवले होते. येथील कुंडांत सर्वाधिक १५७ मूर्ती विसर्जित केल्या. त्यानंतर छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत ४०, तर ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाच्या अखत्यारित ४५ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. याबरोबरच जिल्ह्यात अन्य ठिकाणीही पर्यावरणपूरक पद्धतीनेच गणेशमूर्ती विसर्जित केल्या. सोमवारी (ता. ५) मोठ्या प्रमाणावर घरगुती गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठीही शहरात १६० कुंड ठेवली आहेत. विविध ठिकाणी विसर्जित केल्या जाणाऱ्या मूर्ती इराणी खणीत विसर्जित केल्या जाणार आहेत.

शहरातील पर्यावरणपूरक विसर्जित मूर्ती
*विभागीय कार्यालय १ - १५७
*विभागीय कार्यालय २- ४०
*विभागीय कार्यालय ३-१२
*विभागीय कार्यालय ४- ४५
----------------------
*एकूण २५४

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92502 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..