रा. तु. भगत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रा. तु. भगत
रा. तु. भगत

रा. तु. भगत

sakal_logo
By

46853

संत गाडगेबाबांवर बेचाळीसावे पुस्तक
रा. तु. भगत यांची लोकसेवा, दुर्मिळ छायाचित्रांचाही समावेश
सकाळ वृत्तसेवा
साने गुरुजी वसाहत, ता. १ ः येथील साहित्य विश्‍वातील अग्रेसर नाव म्हणजे प्राचार्य रा. तु. भगत. आजवर त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अनेक पुस्तकांची निर्मिती झाली. पण, या साऱ्या प्रवासात त्यांनी संत गाडगेबाबा यांचे जीवनचरित्र समाजाच्या तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी अखंड परिश्रम घेतले. संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित ‘संत गाडगेबाबा सचित्र जीवनदर्शन’ हे त्यांचे केवळ गाडगेबाबा यांच्यावरील बेचाळीसावे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे, ते वाचकप्रिय ठरते आहे.
गाडगेबाबांना अन्याय सहन होत नसे. आपण अडाणी राहिलो तर अन्याय होत राहील. यासाठी शिक्षण घ्या आणि स्वतःच आपल्या समाजाचा विकास करा, ही प्रेरणा त्यांनी सर्वांना दिली. त्यांच्या जन्मापासून ते जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंतचा प्रवास पुस्तकात सचित्र रूपाने मांडला गेला आहे. अमरावती जिल्ह्यातील जन्मगाव शेणगावातील निवासस्थान, परिवारातील सदस्य, गृहत्यागानंतरचे पहिले छायाचित्र, एकतारी भजन, गाडगेबाबांचे निष्ठावंत सेवक, नाशिक येथील गोदावरी नदी काठावरील गाडगेबाबांची झोपडी, सार्वजनिक स्वच्छता, आसरादेवी यात्रेवेळची हिंसा बंदी, कीर्तनात रंगलेले गाडगेबाबा, विविध समासुधारकांबरोबरची गाडेबाबांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे या पुस्तकात आहेत. चित्रमय पुस्तकाच्या निमित्ताने गाडगेबाबांची समाजकार्याचा सुगंध सर्वत्र पोचेल, असा विश्वास रा. तु. भगत यांनी व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92514 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..