सहा तालुक्यातील आदर्श शिक्षक निवड पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहा तालुक्यातील आदर्श शिक्षक निवड पूर्ण
सहा तालुक्यातील आदर्श शिक्षक निवड पूर्ण

सहा तालुक्यातील आदर्श शिक्षक निवड पूर्ण

sakal_logo
By

सहा तालुक्यांतील आदर्श शिक्षक निवड पूर्ण
तज्ज्ञांनी घेतल्या मुलाखती; उर्वरित तालुक्यातील नावे आज घोषित करणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १ : बदनाम झालेले जिल्‍हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्‍कार नावारुपाला आणण्यासाठी वर्षभर प्रयत्‍न सुरू आहेत. यातच जिल्‍हा परिषदेत सहा महिन्यांपूर्वी प्रशासकांकडे कारभार एकवटला. त्यामुळेच आदर्श शिक्षक पुरस्‍कार निवडीला पोषक वातावरण मिळाले. यातूनच विविध पडताळणी, चाळणी, प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून तालुक्यातून प्रत्येकी तीन शिक्षकांची आदर्श शिक्षकासाठी शिफारस केली. या शिफारशीतून अंतिम केलेल्या शिक्षकांच्या आज दिवसभर मुलाखती घेऊन आज सहा तालुक्यांतील आदर्श शिक्षकांची घोषणा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांनी केली. उर्वरित सहा तालुक्यांतील शिक्षकांची नावे उद्या (ता. २) जाहीर केली जाणार आहेत.
आदर्श शिक्षक पुरस्‍कार प्राप्‍त असे कंसात शाळा ः मारुती पांडुरंग डेळेकर (किणे, ता. आजरा), सचिन बाजीराव भोसले व राजेंद्र पांडुरंग शिंदे (दारवाड व आकुर्डे), प्रशांत मारुती पाटील (सरोळी, ता. चंदगड), अर्चना शरद देसाई (लिंगनूर कसबा नूल, ता. गडहिंग्‍लज), गीतांजली गणपतराव कमळकर (भडगाव, ता. कागल), राजाराम श्रीपती नारींगकर (तिटवे, ता. राधानगरी) तर विशेष पुरस्‍कारासाठी विजय साताप्‍पा परीट (वडगाव, ता. कागल) यांची निवड केली.
आदर्श शिक्षक निवडण्यासाठी आज दिवसभर मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्‍हाण यांच्यासह माध्यमिकचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य सी. वाय. कांबळे, शिक्षण तज्ज्ञ डॉ. सुनीलकुमार लवटे, बी. बी. पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे उपस्‍थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92536 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..