क्षयरोगमुक्त होणार शहर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षयरोगमुक्त होणार शहर
क्षयरोगमुक्त होणार शहर

क्षयरोगमुक्त होणार शहर

sakal_logo
By

जिल्हा क्षयरोगमुक्तीच्या दिशेने
नवीन रुग्णांच्या संख्येत घट; सुवर्णपदकासाठी पात्र; पथकाकडून पडताळणी होणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः दरवर्षीच्या सर्व्हेमधून जास्तीत जास्त रुग्ण शोधायचे, उपचार करून त्यांना बरे करायचे या प्रयत्नातून नवीन रुग्ण सापडण्याच्या संख्येत घट होत असल्याने कोल्हापूर जिल्हा लवकर क्षयमुक्त होऊ शकतो, असा अंदाज राज्य क्षयरोग विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात नवीन रुग्ण सापडण्याच्या संख्येत २०१५ च्या तुलनेत ६० टक्के घट झाल्याने विभागाने जिल्ह्याला सुवर्णपदकासाठी पात्र ठरवले आहे. याबाबत केंद्रीय विभागाच्या पथकाकडून लवकरच पडताळणी केली जाणार आहे.
क्षयरोगमुक्त महाराष्ट्र करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. रुग्णांपर्यंत यंत्रणा पोहचलीच नाही, तर हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी दरवर्षी सर्व ठिकाणी सर्व्हे करून रुग्ण शोधमोहीम राबवली जात आहे. यातून जितके संशयित आढळतील त्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. शहरात पाच वर्षांत दरवर्षी एक हजारावर रुग्ण सापडले. यंदा ऑगस्टपर्यंत हा आकडा ९६९ वर पोहचला आहे. जितके जास्त रुग्ण आढळतील तितका रोगाचा प्रसार रोखता येणार आहे, असे क्षयरोग विभागाचे मत आहे. या महिन्यात रुग्ण शोधण्यासाठी वार्षिक सर्वेक्षण होत असून क्षयरुग्ण सापडू शकतील, अशी शहरातील ४० ठिकाणे महापालिकेकडून निश्‍चित केली जात आहेत. ग्रामीणमध्ये सरसकट सर्व्हे केला जाणार आहे. काही वर्षांच्या आकडेवारीचा तसेच तिथून बरे होत असलेल्या रुग्णसंख्येचा अभ्यास करून राज्य क्षयरोग विभागाने जिल्हा क्षयरोगमुक्त होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. नवीन रुग्ण सापडण्यात ६० टक्के घट झाली असल्याने जिल्हा सुवर्णपदक मिळवण्यास पात्र असून त्याच्या पडताळणीसाठी केंद्रीय क्षयरोग विभागाचे पथक येणार आहे.

कोट
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत रुग्णसंख्येत घट झाली असल्याने राज्य क्षयरोग विभागाने जिल्ह्याला सुवर्णपदकासाठी नामांकन दिले आहे. या पद्धतीने कामकाज सुरू असल्याने लवकरच जिल्हा क्षयरोगमुक्त होऊ शकतो, असे राज्याच्या विभागाचे मत आहे.
- डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा क्षयरोग निर्मूलन अधिकारी, कोल्हापूर

शहरातील रुग्ण
- वर्ष * रुग्ण
*२०१७- १०९१
*२०१८- १०७७,
*२०१९- १५८६
* २०२०- १४३४
* २०२१- १५३६
* २०२२- ९६९(आजअखेर)
.........
जिल्हा रूग्ण
२०१५ -३००२
२०२२-१८०८ (आजअखेर)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92545 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..