पोलिस वृत्त एकत्रित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त एकत्रित
पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

sakal_logo
By

४७१४०

करवीर पोलिस निरीक्षकपदी
अजय सिंदकर यांची नियुक्ती
कोल्हापूर, ता. १ ः करवीर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदाचा पदभार अजय सिंदकर यांनी स्वीकारला. दोन महिन्यापासून हे पद रिक्त होते. सिंदकर मुळचे सातारा येथील आहेत. ते २००४ मध्ये पोलिस दलात रुजू झाले. यापूर्वी त्यांनी मुंबई, ठाणे ग्रामीण, नागपूर, सांगली येथे कर्तव्य बजावले आहे. पहिल्यांदाच त्यांची कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली आहे.

४७१४२
संभाव्य चकमक रोखण्यात यश
पोलिस अधीक्षकांकडून कौतुक; वाहतूक पोलिसांसह होमगार्ड यांची सतर्कता
कोल्हापूर, ता. १ ः बागल चौकात दोन गटातील चकमक वाहतूक पोलिस आणि होमगार्ड यांच्या सतर्कतेमुळे वेळीच रोखली गेली. त्यांच्या या कामागिरीबद्दल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहर वाहतूक पोलिस अमंलदार रवींद्र आवळे, होमगार्ड महादेव पाटील, उमेश देसाई आणि राजेंद्र पोवार अशी त्यांची नावे आहेत.
गणेश आगमनानिमित्त वाहतुकीच्या नियोजनासाठी शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात होता. बागल चौक येथे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे अमंलदार रवींद्र आवळे आणि त्यांच्यासोबत होमगार्ड महादेव पाटील, उमेश देसाई, राजेंद्र पोवार हे कर्तव्य बजावत होते. दरम्यान सायंकाळी साडेसातच्या सुमारास या मार्गावर दोन गटात वाद होऊन हाणामारी सुरू झाली. हा प्रकार निदर्शास येताच कर्तव्य बजावणारे आवळेंसह होमगार्ड यांनी भांडण सोडविण्यासाठी धावले. त्याचबरोबर संबधिताचे मोबाईलवर चित्रीकरणही करण्यास सुरवात केली. तसे दोन्ही गटांनी तेथून पळ काढला. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. ही कामगिरी करणाऱ्यांचा पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी प्रमाणपत्र देऊन गौरविले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92553 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..