शौमिका महाडिक यांच्याकडून गोकुळ अध्यक्षांची दिलगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शौमिका महाडिक यांच्याकडून गोकुळ अध्यक्षांची दिलगिरी
शौमिका महाडिक यांच्याकडून गोकुळ अध्यक्षांची दिलगिरी

शौमिका महाडिक यांच्याकडून गोकुळ अध्यक्षांची दिलगिरी

sakal_logo
By

शौमिकांनी व्यक्त केली
गोकुळ अध्यक्षांची दिलगिरी
सभेत एकेरी उल्लेख; विरोधाची धार कायम राहणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष विश्‍वास पाटील यांचा एकेरी शब्दात उच्चार केल्याबद्दल संचालिका शौमिका महाडिक यांनी दिलगिरी व्यक्त केली. सभासदांचे प्रश्‍न पोटतिडकीने मांडताना अनावधानाने अध्यक्ष पाटील यांचा एकेरी उल्लेख झाला, असे म्हणत महाडिक यांनी मोठ्या मनाने माफी मागत कामाच्या ठिकाणी काम करावे; पण ज्येष्ठांचाही मान राखावा, असा संदेश दिला आहे. हे सांगत असतानाच त्यांनी आपण दिलगिरी व्यक्त केली याचा अर्थ आपल्या विरोधाची धार कमी केली असा होत नाही. ती नेहमीच राहणार असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.
कसबा बावडा येथील सैनिक महादरबार हॉल सोमवारी (ता. २९) गोकुळच्या सभेत गदारोळ झाला. घोषणा, शिट्ट्या, एकमेकांकडे रागाने पाहणे याशिवाय एकमेकांच्या नावांच्या जयघोषणा केल्या. संचालिका शौमिका महाडिक यांनी सभासदांच्या दालनात उभे राहून विविध प्रश्‍न उपस्थित केले. दरम्यान, आमचे प्रश्‍न ऐकून घेतले जात नाहीत, असा आरोप करत महाडिक आक्रमक झाल्या. या वेळी त्यांच्या तोंडून अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्याबद्दल एकेरी शब्दाचा वापर झाला. अध्यक्ष पाटील वयाने ज्येष्ठ आहेत. त्यांना एकेरी बोलणे योग्य नाही; पण गोकुळच्या वार्षिक सभेतील विषय बहुमताने नामंजूर होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे होते. विरोधकांकडून ज्या मागण्या केल्या जात होत्या किंवा जे प्रश्‍न विचारले जात होते, ते अध्यक्षांपर्यंत पोचत नव्हते कारण त्यांनी आम्हाला दिलेल्या स्पिकरचा आवाज बंद केला होता. त्यामुळे हा प्रकार घडला असावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92560 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..