कौटूंबिक वादाची सीमा ओलांडू नका; न्यायाधीश ओंकार देशमूख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौटूंबिक वादाची सीमा ओलांडू नका; न्यायाधीश ओंकार देशमूख
कौटूंबिक वादाची सीमा ओलांडू नका; न्यायाधीश ओंकार देशमूख

कौटूंबिक वादाची सीमा ओलांडू नका; न्यायाधीश ओंकार देशमूख

sakal_logo
By

कौटुंबिक वादाची सीमा ओलांडू नका
न्यायाधीश ओंकार देशमुख; हरळीमध्ये महिला विधी साक्षरता अभियान
गडहिंग्लज, ता. ४ : घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच, असं म्हटलं जातं. कुटुंबातील निकोप वातावरणासाठी सर्व सदस्यांनी एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. पण काही वेळेला टोकाच्या वादाचे रूपांतर भांडणात होते व त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात, म्हणूनच कधीच कौटुंबिक वादाची सीमा ओलांडू नये, असे आवाहन येथील जिल्हा न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी केले.
हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील सिंबायोसिस स्कूलमध्ये ग्रामपंचायत व तालुका विधी सेवा समिती आयोजित महिला विधी साक्षरता अभियानात ते बोलत होते.
देशमुख म्हणाले, ‘‘आपण शिक्षणाने साक्षर होतोच. पण त्याबरोबरच महिलांच्या सक्षमीकरणासाठी असलेले कायदेविषयक ज्ञान समजून घेत साक्षर होणे काळाची गरज आहे. त्याच हेतूने हे अभियान तालुक्यात राबविण्यात येत आहे.’’
गटविकास अधिकारी शरद मगर, अ‍ॅड. शीतल साळवी, डॉ. शुभांगी निकम, गीता मोरे यांनी मार्गदर्शन केले. भारतरत्न मदर तेरेसा यांच्या जीवनपटावर आधारित तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे अनावरण झाले. मुख्याध्यापक संभाजी कार्वेकर यांनी स्वागत केले. ‘सिंबायोसिस’च्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत म्हटले. मारुती कोळूनकर व जाधव यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामसेविका वैशाली कुरळे यांनी आभार मानले. सरपंच नीलम कांबळे, उपसरपंच बाजीराव गोरुले, रेणुका परीट, शिरीष हरळीकर, बळवंत गुरव, अंजना साटपे, मेघा पाटील, छाया खवरे, नीलिमा डवरी, विस्तार अधिकारी घुले, अमर कांबळे, संदीप उंडाळे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92577 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..