छत्रपती प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम
छत्रपती प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम

छत्रपती प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम

sakal_logo
By

छत्रपती प्रतिष्ठानतर्फे आजपासून विविध उपक्रम
दानोळी ः येथील छत्रपती प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. आई वृद्धाश्रमास मदत, शनिवारी (ता. ३)श्रावणबाळ विकलांग वसतिगृहास मदत, रविवारी (ता. ४) बहुजन मराठा समाज हॉल परिसरात स्वच्छता, सोमवारी (ता. ५) प्राथमिक आरोग्य केंद्रात फळेवाटप करण्यात येणार आहेत. रात्री भजनाचा कार्यक्रम होईल. मंगळवारी (ता. ६) जिल्हा परिषद शाळा व दानोळी हायस्कूलमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आणि रात्री होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे. त्याचे उद्‍घाटन सरपंच सुनीता वाळकुंजे यांच्या हस्ते होईल. गुरुवारी (ता. ८) पारंपरिक पद्धतीने मिरवणूक निघणार आहे. त्याचे उद्‍घाटन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होईल. या वेळी शकडो वर्षांपूर्वीपासूनचा दानोळी गावचा इतिहास स्क्रीनवर दाखविण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92656 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..