अनुसूचित जातीच्या कामात फेरफार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुसूचित जातीच्या कामात फेरफार
अनुसूचित जातीच्या कामात फेरफार

अनुसूचित जातीच्या कामात फेरफार

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

अनुसूचित जातीच्या कामातही फेरफार
लोकप्रतिनिधींचा हस्‍तक्षेप; चौकशीवर मर्यादा, दबावामुळे अधिकारीही हतबल
सदानंद पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २ : जिल्‍हा परिषद समाजकल्याण विभागाकडून अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध वसाहतीत विकासकामे करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधीचा निधी दिला जातो. दोन वर्षात सरासरी ३५ कोटींवर निधी दिला आहे. त्यातून आत्तापर्यंत १ हजार कामे झाली आहेत. तर तेवढीच कामे पूर्णत्‍वाच्या मार्गावर आहेत. मात्र यातील अनेक कामे दलित वस्‍तीच्या बाहेर केली आहेत. ज्याप्रमाणे जिल्‍ह्यात साकव घोटाळा झाला त्याचीच पुनरावृत्ती अनुसूजित जाती-जमातीच्या कामांसाठी दिलेल्या निधीत होत आहे. याबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी केल्यास राजकीय दबाव आणला जात असल्याने अधिकारीही हतबल आहेत.
समाजकल्याण विभागाचा निधी हडपण्यासाठीच असल्याचा समज आहे. कारण या निधीवर कोणाचेही नियंत्रण नाही. एकदा निधी वितरण झाले की काम पूर्ण झाल्यानंतरच त्याची माहिती मिळते. तोपर्यंत चुकीच्या पद्धतीने काम पूर्ण केलेले असते. तालुका स्‍तरावर विस्‍तार अधिकारी दर्जाचे कर्मचारी नसल्याने त्याची तपासणी केली जात नाही. काम सुरू होत असतानाच ते मंजूर झालेल्या ठिकाणी केले जात आहे का, त्याबाबतची संबंधित लोकांना माहिती आहे का याचीही माहिती घेणे आवश्यक आहे. मात्र तसे होत नसल्याने सर्रास चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे.
समाजकल्याण विभागाकडे हातकणंगले, शिरोळ, पन्‍हाळा, शाहूवाडी, करवीर तालुक्यातून याबाबत तक्रारी प्राप्‍त झाल्या आहेत. या तक्रारींची चौकशीसाठी अधिकारी गेले असता त्यांच्यावरच दबाव टाकला. त्यामुळे चौकशीलाही मर्यादा आल्या आहेत. याचबरोबर इतर तालुक्यातूनही तक्रारी येत आहेत. चौकशीस जाण्यासाठी मनुष्यबळ व वाहनांची व्यवस्‍था नाही. प्रशासनाकडून याबाबतची व्यवस्‍था झाल्यास आणि संबंधित कामाच्या प्रत्येक टप्‍प्यावर समाजकल्याण व बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित भेट दिली तर अनेक तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे.

कामाबाबतच्या तक्रारी अशा
- नियमाप्रमाणे कामे होत नाहीत
कामामध्ये गुणवत्ता नाही
त्याच त्या कामांसाठी निधीची तरतूद
मंजूर वसाहती बाहेर कामे
चौकशी झाल्यास दबाव तंत्राचा वापर

वर्ष खर्च कामांची संख्या
२०२१/२२ ३७ कोटी ८२ लाख ८६२
१ कोटी ९० लाख ९५
२०२२/२३ ३६ कोटी ६३ लाख ८७३


समाजकल्याण विभागाकडून गावागावातील अनुसूचित जातीच्या वसाहतींमध्ये विकासकामांना निधी दिला जातो. मात्र ही कामे इतर वसाहतीत होत असल्याच्या तक्रारी आहेत. चौकशीतही अनेक अडचणी येत आहेत. मुळात निधी देणाऱ्या विभागाचे कामावर नियंत्रण नाही. ही जबाबदारी बांधकाम विभागाकडे आहे. दिलेला निधी १०० टक्‍के खर्च झाल्यानंतर केवळ १० टक्‍के रकमेचे काम तपासता येते. मात्र हे काम पूर्ण झाले असल्याने काहीच करता येत नाही. यामध्ये बदल होणे आवश्यक आहे.
- दीपक घाटे, जिल्‍हा समाजकल्याण अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92700 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..