जुना वाशी नाका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुना वाशी नाका
जुना वाशी नाका

जुना वाशी नाका

sakal_logo
By

47373

जुना वाशी नाक्याजवळील
ड्रेनेज लाईनची स्वच्छता

कोल्हापूर, ता. २ ः जुना वाशी नाक्याजवळ वारंवार ड्रेनेज लाईन तुंबून मैलायुक्त सांडपाणी रंकाळा तलावात मिसळत होते. त्यामुळे महापालिकेने आज खोदाई करून लाईन स्वच्छ करून घेतली.
जुना वाशी नाका ते पद्माराजे गार्डनपर्यंतच्या भागात ड्रेनेज लाईन सतत तुंबते. त्याच्या मॅनहोलमधून बाहेर पडणारे मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावर तर पसरतेच. शिवाय तांबट कमानीजवळून रंकाळा तलावात मिसळत होते. त्याबाबत तक्रार झाल्यानंतर जुजबी स्वच्छता केली जात होती. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तोच प्रकार घडत होता. गेल्या आठवड्यापासून वारंवार सांडपाणी रंकाळा तलावात मिसळत होते. त्याआधी पावसामुळे लक्षात येत नव्हते. गुरुवारीही स्वच्छता केली होती, तरीही लाईन तुंबली होती. त्यामुळे आज सकाळपासून ड्रेनेज विभागाकडून त्या ड्रेनेज लाईनजवळ खोदाई करण्यात आली. त्यानंतर स्वच्छता करून काम पूर्ण केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92720 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..