पंधरा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्‍कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंधरा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्‍कार
पंधरा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्‍कार

पंधरा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्‍कार

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...


तंत्रस्नेही शिक्षकांनाच पुरस्‍कार
प्रशासक संजयसिंह चव्हाण; आदर्श शिक्षक पुरस्‍कारांची घोषणा
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २ : जिल्‍हा परिषद शिक्षण विभागाकडून दिल्या जाणाऱ्या डॉ. सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन जिल्‍हा आदर्श शिक्षक पुरस्‍कारांची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांनी केली. एकूण १५ शिक्षकांची या पुरस्‍कारासाठी निवड केली. शिक्षणाची तळमळ व तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्‍न करणाऱ्या शिक्षकांचीच पुरस्‍कारासाठी निवड केल्याचे श्री. चव्‍हाण यांनी सांगितले.
पुरस्‍कारप्राप्‍त शिक्षक असे ः मुख्याध्यापिका अरुणा चंद्रकुमार शहापुरे (बुबनाळ, ता. शिरोळ), विषय शिक्षक शिवाजी केशव पाटील (चरण, ता. शाहूवाडी), मुख्याध्यापक तानाजी शिवराम घरपणकर (केंद्रशाळा पुनाळ, ता. पन्‍हाळा), विषय शिक्षक दत्तात्रय दादू पाटील (नागाव, ता. करवीर), विषय शिक्षक सुषमा दिलीप माने (केंद्रशाळा भादोले) अध्यापक महेश रामचंद्र बन्ने (कन्या वाठार तर्फ वडगाव, ता. हातकणंगले) यांना विभागून तसेच अध्यापक विश्‍‍वास बंडू भोसले (मांडुकली, गगनबावडा) यांची आदर्श शिक्षक पुरस्‍कारासाठी आज निवड केली. गुरुवारी (ता.१) मारुती डेळेकर, सचिन भोसले, राजेंद्र शिंदे, प्रशांत पाटील, अर्चना देसाई, गीतांजली कमळकर, राजाराम नारींगकर व विजय परीट यांची निवड करण्यात आली आहे.

यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्‍कारासाठी नियमावली तयार केली. काटेकोर नियोजन करून आदर्श शिक्षक पुरस्‍कारासाठी निवड केली. नियम पाहून अनेक शिक्षकांनी यात भागही घेतला नाही. एकूण १५ पुरस्‍कारार्थीपैकी १० शिक्षकांनी पहिल्यांदाच पुरस्‍कारासाठी अर्ज केला आहे. या शिक्षकांची शिक्षण व विद्यार्थ्यांविषयी असणारी तळमळ, त्यांची सचोटी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणासाठी होणारा वापर याचा विचार करून निवड केली आहे.
- संजयसिंह चव्‍हाण, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92773 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..