शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षा
शिक्षा

शिक्षा

sakal_logo
By

बालकाशी अनादर
करणाऱ्या एकास शिक्षा

कोल्हापूर, ता. २ ः बालकास शाळेमध्ये नग्न करून त्याचा अनादर केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एकास दोषी ठरवले. त्याला तीन महिन्याची शिक्षा सुनावली. गजानन प्रभाकर साळोखे (वय ४२) असे त्याचे नाव आहे. सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी वकील शीतल रोटे यांनी काम पाहिले.
जिल्ह्यातील एका गावात गजानन साळोखे राहतो. त्याच्या मुलीचे चप्पल शाळेतील एका मुलाने छतावर टाकले होते. त्याच रागातून त्याने २०१७ मध्ये पीडित मुलाचे कपडे काढून त्याला नग्न करून चिमटे काढले आणि त्याला शाळेच्या छतावर चढवून मुलीचे चप्पल काढायला सांगून अपमानित केले. याची नोंद पोलिस ठाण्यात झाली होती. याचा तपास तत्कालीन पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी केला. खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक ४) एस. पी. गोंधळेकर यांच्या न्यायालयात झाली. सरकारपक्षातर्फे ॲड. रोटे यांनी नऊ साक्षीदार तपासले. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने साळोखे यास दोषी ठरवले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92777 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..