गड-गोवा दारु जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-गोवा दारु जप्त
गड-गोवा दारु जप्त

गड-गोवा दारु जप्त

sakal_logo
By

४७३२५

पावणेदोन लाखांची दारू जप्त
सुळेजवळ उत्पादन शुल्कची कारवाई; सांबरेच्या एकाला अटक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : सुळे (ता. आजरा) येथे गोवा बनावटीची पावणेदोन लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणी सांबरे (ता. गडहिंग्लज) येथील एकाला अटक केली आहे. जयवंत पांडुरंग चव्हाण असे त्याचे नाव आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैद्य मद्य विक्रीवर छापासत्र सुरू केले आहे. उत्पादन शुल्क चुकविलेल्या मद्य वाहतुकीवर निर्बंधासाठी विविध ठिकाणी तपासणी नाके लावण्यात आले आहेत. दरम्यान, गुरुवारी (ता.१) रात्री उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला सुळे गावाजवळ संशयास्पद टेम्पो आढळून आला. त्याची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या दारुचे ३७ बॉक्स मिळाले. त्याची किंमत एक लाख ७९ हजार ४० रुपये होते. या मद्यसाठ्यासह सदरचा टेम्पोही जप्त केला आहे. हा मद्य साठा जयवंत चव्हाण याचा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एम. एस. गरुड, दुय्यम निरीक्षक किरण पाटील, एस. आर. ठोंबरे, जवान बी. ए. सावंत, जी. एस. जाधव, एस. बी. चौगुले, ए. टी. थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास किरण पाटील करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92786 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..