इचल:कुत्र्यांचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल:कुत्र्यांचा हल्ला
इचल:कुत्र्यांचा हल्ला

इचल:कुत्र्यांचा हल्ला

sakal_logo
By

४७३२२

दत्तवाडात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद
हल्ला सत्र सुरूच; शेताकडे निघालेल्या शेतकऱ्याचे तोडले लचके
इचलकरंजी, ता. २ : दत्तवाड-दानवाड रस्त्यावरील सिद्धनाळे मळ्यात कामानिमित्त गेलेले शेतकरी सचिन अण्णाप्पा सिदनाळे (वय ४५) यांच्यावर सकाळी दहाच्या सुमारास तीन ते चार मोकाट कुत्र्यांनी जोरदार हल्ला केला. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या मानेवर, खांद्यावर, हाता-पायावर गंभीर जखमा झाल्‍या आहेत. त्यांचा ओरडा ऐकून परिसरातील शेतकरी व नागरिकांनी त्यांची सुटका केली.
दतवाड येथे मोकाट कुत्र्यांचे हल्ले वाढतच आहेत. पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. भटक्या कुत्रांच्या हल्ल्यात जखमी सचिन सिद्धनाळे यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याची माहिती मिळताच कुरुंदवाडचे पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पालिकेचे श्‍वानपथक, वन विभाग तसेच पोलीस प्रशासन मिळून एकत्रित कारवाई करणे आवश्यक आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी गावातील तरुणांनी सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले.
१८ ऑगस्टला अपूर्वा शिरढोणे या शाळकरी मुलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून तिला गंभीरित्या जखमी केले होते.

आदेश कागदावरच
दत्तवाड येथे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे -धुमाळ यांनी २२ ऑगस्टला भेट देऊन ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी आदींना कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र हे आदेश केवळ बैठकी पुरतेच राहिल्याने स्थानिक प्रशासनाच्या कारभाराचा फटका शेतकरी, मुले, महिला यांना सहन करावा लागत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92788 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..