सीपीआर हॉस्पीटल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीपीआर हॉस्पीटल
सीपीआर हॉस्पीटल

सीपीआर हॉस्पीटल

sakal_logo
By

‘सीपीआर’मधील दाखले
देण्याच्या सेवेत सुधारणा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः सीपीआर रुग्णालयात जन्म व मृत्यू दाखले तसेच दिव्यांग प्रमाणपत्रे देण्याच्या सुविधेत सुधारणा केल्या आहेत. त्यासाठी वेळ, दिवस निश्चित केले आहेत. जेणेकरून दाखले वेळेत मिळावेत. त्यासाठी जास्त वेळ थांबावे लागू नये, यासाठी बदल केले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली.
सीपीआरच्या जन्मलेल्यांचे तसेच मृत्यू झालेल्यांचे दाखले सीपीआरच्या जन्म दाखले विभागात देण्यात येतात. जन्म व मृत्यूचे दाखले याबाबत सध्या सीपीआर आवक-जावक विभागात अर्ज स्वीकारण्यात येत होते. असे अर्ज ५ सप्टेंबरपासून जन्म दाखले विभागात सकाळी १० ते दुपारी दीड वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत, तर दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत दाखल्यांचे वितरण होणार आहे.
दिव्यांगांना प्रमाणपत्र तसेच रेल्वे प्रवास सवलतीकरीता व्यक्तींनी तपासणीचे दिवसही निश्चित केले आहेत. त्यानुसार आठवड्यातील दर बुधवारी व गुरुवारी या दिवशी रेल्वे प्रवास सवलतींच्या व्यक्तींच्या तपासणीची व प्रमाणपत्र देण्याची सुविधा केली आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींना किंवा जन्म, मृत्यू दाखल्यासाठी आलेल्या व्यक्तींना काही तक्रार, अडचणी असल्यास, माहिती हवी असल्यास सीपीआरमधील पहिला मजला, बाह्यरुग्ण विभाग कक्ष क्रमांक १२६ येथे समाजसेवा अधीक्षकांना भेटून शंका निरसन करून घेता येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92790 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..