बार असोसिएशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बार असोसिएशन
बार असोसिएशन

बार असोसिएशन

sakal_logo
By

४७३४२

दुय्यम निबंधक कार्यालय
पेठवडगावात सुरू करा
जिल्हा, वडगाव बार असोसिएशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर, ता. २ ः हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे दुय्यम निबंधक कार्यालयास मंजुरी द्या, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आणि पेठवडगाव बार असोसिएशनने केली. शिष्टमंडळाने याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन दिले.
जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके यांनी हातकणंगले तालुक्यात दस्त नोंदणीस पक्षकारांना अडचणी येतात. पेठवडगाव हे नव्याने विकसित झालेले शहर आहे. ते महामार्गालगतचे ठिकाण असल्याने पक्षकारांना दस्त नोंदणीसाठी सोयीचे असल्याचे सांगितले.
पेठवडगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अविनाश तांदळे यांनी पेठवडगाव येथे दुय्यम निबंधक कार्यालयाकरिता जागा उपलब्ध आहे, नगरपरिषदेने ठराव दिल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी रेखावार यांनी दुय्यम निबंधक कार्यालय मजुरीकरिता लवकरच पुण्यातील आय. जी. आर. कार्यालय आणि जिल्हा मुद्रांक कार्यालयाकडून लवकर अहवाल मागणी करू, असे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, सचिव ॲड. विजयकुमार ताटे-देशमुख, ॲड. संदीप चौगुले, ॲड. नारायण भांदिगरे, ॲड. उदय महाजन, ॲड. उमेश पाटील, ॲड. शीतल पाटील, ॲड. विजय पाटील, ॲड. दीपक पाटील, ॲड. वारणा सोनावणे, ॲड. विश्वजित गावडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92821 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..