नगररचना कॅम्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगररचना कॅम्प
नगररचना कॅम्प

नगररचना कॅम्प

sakal_logo
By

‘नगररचना’च्या विशेष कॅम्पमध्ये
१३६ बांधकामांना परवानगी

कोल्हापूर, ता. २ : नगररचना विभागाने घेतलेल्या दोन दिवसांच्या विशेष कॅम्पमध्ये १३६ बांधकामांना परवानगी देण्यात आल्या. आज ८३ बांधकामांना परवानगी, ३१ भोगवटा प्रमाणपत्र, १३ विभाजन, ६ बांधकाम परवानगींना मुदतवाढ व १० अनामत रक्कम परत देण्यात आली.
भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, जोता चेकिंग, अनामत रक्कम मागणी अर्ज, ले आऊट मंजुरी, एकत्रीकरण व विभाजनाबाबतची प्रकरणे मंजूर करण्यात आली. महापालिका क्षेत्रातील ऑनलाईनपूर्वी दाखल झालेल्या विकास परवानगी (इमारत बांधकाम व भोगवटा) साठी नगररचना विभागामार्फत दोन दिवसांचे विशेष कॅम्पचे आयोजन केले होते. सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन, उपशहर रचनाकार रमेश मस्कर व कनिष्ठ अभियंत्यांनी दाखल झालेली प्रकरणे तपासून मंजूर केली. या कॅम्पला नागरिक व आर्किटेक्टकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ऑफलाईन परवानगीसाठी दाखल झालेली जुनी प्रकरणे या कॅम्पमधून निकाली काढली जात आहेत; मात्र या विभागातील एजंटांचा सुळसुळाट थांबवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यांच्यामुळे अनेक सामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92834 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..