सतेज पाटील पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सतेज पाटील पाहणी
सतेज पाटील पाहणी

सतेज पाटील पाहणी

sakal_logo
By

47366

सूचनांप्रमाणे कामांच्या पूर्ततेची
आमदार पाटील यांनी केली खात्री
कोल्हापूर, ता. २ : पंचगंगा स्मशानभूमीची काल (ता. १) पाहणी करताना दिलेल्या सूचनांप्रमाणे काम झाले की नाही, याची आमदार सतेज पाटील यांनी आज पाहणी केली. आरोग्य विभागास खरमाती उचलणे, गवत काढणे व स्क्रॅप हलविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्मशानभूमीच्या परिसरातील गवत काढले होते. खरमाती उचलण्याचे काम सुरू होते. सूचनेप्रमाणे काम केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरित कामेही तातडीने पूर्ण करा, स्वच्छतेबाबत दक्ष राहा, आठवड्यातून एकदा स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबवा. रस्त्याकडेला पडलेली लाकडे स्थलांतरित करा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक महेश भोसले उपस्थित होते.
दरम्यान, आज सकाळी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत महापालिकेनेही स्वनिधीतून दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी एक कोटीची तातडीने तरतूद करावी, अशी सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना केल्या. प्रकाश नाईकनवरे, शारंगधर देशमुख यांनी सुशोभीकरणावर दोन वर्षांत ३० लाख खर्च झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, नेमका कुठे खर्च झाल्याच्या प्रश्‍नावर अधिकाऱ्यांना यावर समाधानकारक उत्तर देता आले नाही. उपायुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, अश्‍कीन आजरेकर, सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, प्रताप जाधव उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92845 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..