कृषी महाविद्यालयात तैलचित्राचे अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी महाविद्यालयात तैलचित्राचे अनावरण
कृषी महाविद्यालयात तैलचित्राचे अनावरण

कृषी महाविद्यालयात तैलचित्राचे अनावरण

sakal_logo
By

विजयाराजे शिंदे यांच्या
तैलचित्राचे आज अनावरण
कृषी महाविद्यालयात ज्योतिरादित्य शिंदे यांची उपस्थिती
कोल्हापूर, ता. २ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान यांच्या व्यावसायिक सामाजिक दायित्व निधीतून बांधलेल्या राजमाता विजयाराजे शिंदे मुलींचे वसतिगृह इमारतीमध्ये राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या तैलचित्राचे अनावरण उद्या (ता. ३) केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होत आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कृषी शिक्षणाकडे ग्रामीण भागातील मुलींचा वाढता कल लक्षात घेऊन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून श्री भास्कराचार्य प्रतिष्ठानने व्यावसायिक सामाजिक निधीतून १०५ विद्यार्थिनींच्या क्षमतेचे वसतिगृह बांधण्याची जबाबदारी घेतली होती. या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर, भास्कराचार्य प्रतिष्ठानचे स्थानिक अध्यक्ष प्रा. डॉ. भारत खराटे उपस्थित राहणार आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील अध्यक्षस्थानी असतील. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. शरद गडाख, कुलसचिव प्रमोद लहाळे उपस्थित राहतील. विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शेतकरी बंधूनी उपस्थित राहावे, असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92859 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..