नीलिमा देशपांडे लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीलिमा देशपांडे लेख
नीलिमा देशपांडे लेख

नीलिमा देशपांडे लेख

sakal_logo
By

फोटो ः 47387
-
राजमाता विजयाराजे शिंदेः
एक खरीखुरी महाराणी!
लिड
कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयामध्ये राजमाता विजयाराजे शिंदे विद्यार्थीनी वसतीगृह येथे आज (ता.३)राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या तैलचित्राचे अनावरण केंद्रीय मंत्री जोतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होत आहे...त्यानिमित्त...
-नीलिमा देशपांडे

‘मराठा साम्राज्याचा मध्य आणि उत्तर भारतात विस्तार’ असा विषय जरी निघाला तरी प्रथमत: डोळ्यांसमोर नावं उमटतं ते म्हणजे ‘महादजी शिंदे’ यांचं. जवळपास दोनशे वर्ष शिंदे यांनी उत्तर भारतावर राज्य केलं. स्वातंत्र्यानंतर राजेपण संपुष्टात आला; मात्र त्यांच्याबद्दलचा आदर कायम राहिला. ‘भारतीय नागरिक’ अशी ओळख बनलेल्या पिढीतील व्यक्ती म्हणजे जिवाजीराव शिंदे यांच्या पत्नी राजमाता विजयाराजे शिंदे. (सिंदिया)
पूर्वाश्रमीच्या ‘लेखा दिव्येश्वरी’ लग्नानंतर ‘विजयाराजे’ झाल्या. वडिल डेप्युटी कलेक्टर आणि आई नेपाळच्या राजघराण्यातील. आजोळी वाढल्यामुळे वडिलांचाही सहवास नव्हता. आजोबांना मूळ भूमी सोडून मध्य भारतात येऊन राहावे लागले. परंतु, त्यांचे वडिल भारतीय असल्यामुळे बालवयात त्यांना ‘कधी स्वतंत्र होईल माझा देश’ असे वाटत असे. शालेय शिक्षणानंतर त्यांनी महाविद्यायात प्रवेश घेतला. वसतिगृहात राहताना इतर मुलींच्या तुलनेत त्यांचे राहणीमान उच्चीचे आहे, हे लक्षात येताच त्यांनी ‘खादी’ अंगिकारली. तेथीलच जेवणही घेतले. लग्नानंतर त्यांनी पुन्हा आपल्या पतीसाठी त्यांनी आणलेल्या उंची साड्या नेसायला सुरुवात केली. ग्वाल्हेरचे राजे एकवीस तोफांचे मानकरी होते. अशा वेळी इतक्या मोठ्या साम्राज्याची महाराणी खादी वस्त्रांचा स्वीकार करेल तर इंग्रजांसाठी कुरापत काढण्याची नामी संधी उपलब्ध होईल, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे परिस्थिती हा निकष सांभाळत त्यांनी निर्णय घेतले.
विजयाराजे म्हणजे एकदम निर्मळ मनाचे व्यक्तिमत्व, त्यांच्या या स्वभावाची झलक त्यांच्या आयुष्यातील अनेकविधं घटनांमधून जाणवते. त्यांचे आपल्या धर्मावर आणि राष्ट्रावर निरातिशयप्रेम होते. इच्छा नसताना राजकारणाची पायरी त्यांना चढावी लागली. परंतु, एका महाराणीप्रमाणे त्यांनी ती जबाबदारीही उत्तम प्रकारे सांभाळली. विजयाजींच्या जगण्यावर त्यांची आजी आणि त्यांचे पती जिवाजीराव यांचा प्रभाव राहिला. त्यांच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट सगळ्या प्रकारच्या घटनांमध्ये त्यांनी या दोघांची शिकवण कधीही सोडली नाही. आणीबाणीच्या काळात त्यांनी नरक यातना भोगल्या. मात्र शिंदे घराण्याचा वारसा आणि मनातले देशप्रेम या दोन्हीमुळे त्यांनी त्याचा सामना केला. त्यांच्या आयुष्याचा प्रवास पाहता एक मुलगी, एक नात, एक पत्नी, एक आई आणि जनतेची महाराणी या प्रत्येक नात्याला त्यांनी न्याय दिला. प्रत्येक मुलीने त्यांच्या या कर्तृत्ववान आलेखाचा आढावा घ्यावा आणि त्यातून स्फूर्ती घेऊन आपले आयुष्य घडवावे हेच खरे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92867 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..