फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूक
फसवणूक

फसवणूक

sakal_logo
By

४७३९९


राशिवडे बुद्रुकचा म्होरक्या
फसवणूक प्रकरणी जेरबंद
६८ लाखांना गंडा; बायोगॅस प्रकल्पाच्या आमिष
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः सीएनजी, बायोगॅस प्रकल्पाच्या अमिषाने जमीन मालक, डेपो आणि ट्रॅक्टरधारक अशा शेतकऱ्यांची सुमारे ६८ लाखांची फसवणूकप्रकरणी मुख्य संशयितास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. राहुल तानाजी कांबळे (वय ३०, रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी) असे संशयिताचे नाव असल्याचे पोलिस उपनिरीक्षक सुनीता शेळके यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, संशयित राहुल कांबळे आणि १० जणांनी स्टार ॲग्रो व स्टार बिझनेस ॲडव्हायझ प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली. कंपनीमार्फत सीएनजी बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यासाठी फिर्यादीकडून शेतजमीन भाडेतत्त्वावर घेतली. त्यांनी चार लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. प्रकल्पातील डेपो घेण्यासाठी अन्य शेतकऱ्यांना एकूण ४८ लाख ५० हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यातील डेपोधारकांच्या कच्च्या मालाच्या प्रत्येक टनामागे अडीचशे रुपये परतावा देण्याचे ठरवले होते. शेणापासून लाकूड बनविण्याच्या मशिनधारकाला प्रतिमहिना १७ ते २० हजार परतावा देण्याचे अमिष दाखवले. एकूण १८० ट्रॅक्टरधारकांना प्रत्येकी ११ हजार असे एकूण १९ लाख ८० हजार अनामत रक्कम भरण्यास भाग पाडून फसवणूक केली. अशी फिर्याद दाखल झाली होती. त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी मुख्य संशयित राहुल कांबळे याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावल्याचे शेळके यांनी सांगितले. यासंदर्भात आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी ताराराणी पोलिस चौकीतील उपनिरीक्षक सुनीता शेळके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहानही शाहूपुरी पोलिसांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92881 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..