बळीराजासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बळीराजासाठी
बळीराजासाठी

बळीराजासाठी

sakal_logo
By

‘एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम
कृषी अधिकारी जालिंदर पांगारे; अधिकारी, पदाधिकारी जाणून घेणार व्यथा
कोल्हापूर, ता. २ : पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेणार आहेत. त्यासाठी ‘माझा एक दिवस, माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम सुरू आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात हा उपक्रम सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे यांनी दिली.
श्री. पांगारे म्हणाले, ‘‘दुर्गम, डोंगराळ, कोरडवाहू, आदिवासी, सामाजिक व दुर्बल असणाऱ्या क्षेत्राची निवड केली आहे. संबंधित अधिकारी, पदाधिकारी त्यांच्या मुख्यालयापासून दूरची गावे निवडतील. कोरडवाहू शेतकऱ्यांची भेट घेतील. अधिकारी, पदाधिकारी यांनी गावाची निवड केल्यानंतर शासकीय, निमशासकीय, अशासकीय संस्था, गावातील बँक, सोसायटी, दूध संस्था, यांच्याकडून शेतकऱ्यांना कशाप्रकारे लाभ, मदत देतात याबाबत चर्चा केली जाईल.’’
ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, येणारे उत्पादन, खर्च व बचत याची माहिती घेतील. शेतकऱ्यांची नैराश्याची कारणे शोधून त्यासंदर्भात कोणते धोरणात्मक निर्णय घेता येतील याचा अहवाल तयार केला जाईल. भेट देणाऱ्या गावामध्ये ग्राम कृषीविकास समितीची बैठक घेऊन त्यामध्ये पीक पद्धती, शेतकरी वापरत असलेले तंत्रज्ञान याबाबत चर्चा. अधिकारी, पदाधिकारी यंत्रणेमार्फत ज्या विविध योजना राबवितात त्यांची माहिती दिली जाईल.’’
उपक्रमात प्रधान सचिव (कृषी), आयुक्त (कृषी), कृषी संचालक, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, विद्यापीठ विभाग प्रमुख, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभागीय आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) व इतर जिल्हास्तरीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी (महसूल), उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी सहभागी होणार आहेत. कृषी विभागाचे अधिकारी महिन्यातून तीन दिवस तसेच महसूल, ग्रामविकास व इतर विभागांचे अधिकारी महिन्यातून एक दिवस गावांना भेटी देतील.

उपक्रमांवर होणार चर्चा
विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी नवनवीन तंत्रज्ञानाची पीकनिहाय वाणांची माहिती घेतली जाईल. नवीन आधुनिक तंत्रज्ञान अवलंब करणाऱ्या व अधिक उत्पादन घेणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी. गावातील शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट, महिला बचत गट, गटशेती उपक्रम इत्यादी माध्यमातून यशस्वी झालेल्या उपक्रमांवर चर्चा होईल.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92887 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..