कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

‘त्या’ अधिकाऱ्यास
हजर करून घेऊ नये
शिष्टमंडळाची समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : समाजकल्याण विभागातील वादग्रस्त सहाय्यक लेखाधिकाऱ्यास कामावर हजर करून घेऊ नये, अशी मागणी एका शिष्टमंडळाने जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्याकडे केली. मात्र, त्या अधिकाऱ्यांविरोधात कोणताही गुन्हा नोंद नसल्याने कामावरून थांबवणे शक्य होणार नाही, असे घाटे यांनी स्पष्ट केले. यावर शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
जादा उत्पन्न देण्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांची फसवणूक केली आहे. जिल्हा परिषदेतील एक अधिकारी तसेच त्याचा जिल्हा परिषद नोकरीत असणारा मुलगा, मेहुणा आदींविरोधात तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीनंतर संबंधित अधिकारी दीर्घ रजेवर गेला होता. दोन दिवसांपूर्वी तो वादग्रस्त अधिकारी कामावर हजर झाला आहे. याची माहिती मिळताच आज तक्रारदार लोकांचे शिष्टमंडळ जिल्हा परिषदेत धडकले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याचा मुलगा आणि नोटांचे पुडके असलेला फोटो दाखवत सर्व फसवणुकीचे कथन घाटे यांना ऐकवले. तसेच या प्रकरणी मदत करण्याची मागणी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92891 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..