चिंचवडेचे दोन तरुण अपघातात ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवडेचे दोन तरुण अपघातात ठार
चिंचवडेचे दोन तरुण अपघातात ठार

चिंचवडेचे दोन तरुण अपघातात ठार

sakal_logo
By

47402 -विकास तोरस्कर
47401 -
ऋषीकेश राजाराम कांबळे

दोन तरुण मित्र अपघातात ठार
---
मृत चिंचवडेचे; दुचाकींच्या धडकेनंतर ट्रकच्या चाकाखाली
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : फुलेवाडी- बालिंगा रस्त्यावरील पाटील पेट्रोलपंपासमोर दुचाकी वाहनांची धडक झाल्यावर ट्रकखाली सापडलेले दोन तरुण मित्र ठार झाले. चिंचवडे तर्फ कळे (ता. करवीर) येथील विकास संभाजी तोरस्कर (वय २१) व ऋषीकेश राजाराम कांबळे (२१) अशी त्यांची नावे आहेत. विकासचा जागीच, तर ऋषीकेशचा ‘सीपीआर’मध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ज्या दुचाकीशी धडक झाली, तो दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला आहे. गणेशोत्सवादरम्यान उमेदीचे दोन तरुण अपघातात ठार झाल्याने चिंचवडेसह परिसरातील गावांवर शोककळा पसरली आहे.
विकास आणि ऋषीकेश एकाच दुचाकीवरून कोल्हापूरहून चिंचवडे येथील आपल्या घरी निघाले होते. फुलेवाडी- बालिंगा रस्त्यावर ढेरे मळा येथील पाटील पेट्रोलपंपासमोर ट्रकला ओव्हरटेक करताना बालिंग्याकडून फुलेवाडीकडे जाणाऱ्या दुसऱ्या वाहनाचे हॅंडल एकमेकांना घासले. याच दरम्यान ट्रकही जवळून जात होता. हॅंडल घासल्याने विकास आणि ऋषीकेश मोटारसायकलवरून घसरून ट्रकच्या मागील चाकामध्ये पडले. यात विकासचा जागीच मृत्यू झाला. फुलेवाडी येथील अग्निशमन दलाच्या जवानांसह हर्षल सुर्वे व इतरांनी जखमी ऋषीकेशला उपचारांसाठी हलविले. ऋषीकेशच्या डोक्‍याला जबर मार बसला होता. पायालाही गंभीर दुखापत झाली. काही वेळातच त्याला ‘सीपीआर’मध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्याचाही मृत्यू झाला. दोघेही मित्र एकाच ठिकाणी कामाला होते, असे ‘सीपीआर’ येथे सांगण्यात आले.
विकासचे वडील शेती करतात. त्याला एक बहीण आहे. यापूर्वी तो कामानिमित्त गोव्यात होता. आता त्याची बदली झाल्याने तो कोल्हापूरला आला होता. गोव्यातून कोल्हापूरमध्ये कामाला आल्याने आई-वडिलांना व बहिणीलाही मोठा आधार वाटत होता; पण त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कुटुंब, मित्रांचा हंबरडा
अपघाताची माहिती समजताच विकास व ऋषीकेशचे कुटुंबीय आणि त्यांच्या मित्रांनी सीपीआर हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. दोघांनाही मृतावस्थेत पाहिल्यावर कुटुंबीयांसह मित्रांनीही हंबरडा फोडला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत त्याचे मित्र ‘सीपीआर’मध्ये थांबून होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92901 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..