इंप्याक्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंप्याक्ट
इंप्याक्ट

इंप्याक्ट

sakal_logo
By

47539

दारवाड विद्यालयाचे यश
कोनवडे ः जून २०२२ मध्ये झालेल्या एनएमएमएस परीक्षेत माध्यमिक विद्यालय दरवाड (ता. भुदरगड) शाळेचे सात विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले तर १६ विद्यार्थी सारथीच्या शिष्यवृत्तीस पात्र ठरले. एनएमएमएस शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी असे : ओंकार मिटके, अखिलेश भारमल, संचित पाटील, श्रेयश रेडेकर, विक्रांत यादव, तन्मय मोरे, निखिल मोरे. ‘सारथी‘ शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी असे : करणराज मोरे, निशाद कदम, मेघा वैद्य, श्रेया चौगले, मृणाली भारमल, श्रुतिका राजीगरे, योगेश कवडे, आर्यन पाटील, हर्षद देसाई, चिन्मय ढेरे, आदित्य पाटील, आर्या मेंगाणे, चंदना चव्हाण, आर्या पाटील, पायल देसाई, स्नेहल देसाई. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका माधुरी चौगले यांचेसह संस्थेचे सचिव बी. डी. चौगले व सर्व शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभले.

2953
सरवडेत मतदार नोंदणी अभियान
सरवडे : भारतासारख्या लोकशाही असणाऱ्या देशांत तरुणांचा मताला महत्त्व आहे. त्यामुळे मतदारांची वेळेत नोंदणी करून त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गोकुळचे संचालक विजयसिंह मोरे यांनी केले. येथील किसनराव मोरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रेरणेतून मिस्ड कॉलवर नवीन मतदार नोंदणी अभियानाची सुरुवात झाली. अभियानाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमात ते बोलत होते. राधानगरी तालुका काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील कौलवकर म्हणाले, ‘‘लोकशाहीत मतदानाला विशेष अधिकार आहे. त्यामुळे नवीन युवक-युवतींनी मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी नोंदणी करावी.’’ माजी प्राचार्य बी. जी. कुदळे, प्राचार्य पी. एस. पाटील, क्रीडा शिक्षक विक्रमसिंह मोरे आदी उपस्थित होते.

३०६९
राशिवडेत रस्त्याची दुरुस्ती
राशिवडे बुद्रुक : ‘सकाळ’मधून आलेल्या येथील रस्त्याची दुरवस्था बातमीची दखल घेऊन खड्डे दुरुस्त केले. इतकेच नाही तर ग्रामपंचायती समोरील रस्त्यावर असलेला धोकादायक चेंबरही हटवला आहे. मुख्य बाजारपेठेमध्ये रस्त्याची झालेली दुरवस्था, रेंगाळले काम, नामानंद चौकात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या प्रारंभी पडलेला खड्डा, त्यात तुंबलेले पाणी, बाजारपेठेतील रस्त्याच्या मधोमध असलेले चेंबर यामुळे वाहतुकीला निर्माण झालेला धोका, वेशीवरच खड्ड्यांचे साम्राज्य अशा समस्यांवर ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. याची दखल घेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डे बुजवले आहेत. शिवाय धोकादायक चेंबरही हटविला आहे. यामुळे प्रवास काहीसा सोयीचा ठरत आहे.


शरयू पाटील हिचा सत्कार
पुनाळ : केंद्रशाळा कोलोली (ता. पन्हाळा) शाळेतील विद्यार्थिनी शरयू युवराज पाटील हिने तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल गटविकास अधिकारी सुभाष सावंत, गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव मानकर यांच्या हस्ते तिचा सत्कार झाला. विस्तार अधिकारी आर. टी. बरगे, केंद्रप्रमुख एस. पी. चौगुले, प्र. मुख्याध्यापक अनिल आंगठेकर, वर्गशिक्षिका स्नेहल घाटगे, अजय दाभोळकर, संतोष जायभाय, अरुणा वसावे, प्रीतम पाटील, निवास कांबळे, युवराज पाटील, विस्तार अधिकारी सुहास पाटील, सी. डी. सावंत, गणपती मांडवकर, केंद्रप्रमुख सुनील अस्वले, श्री. कुबेर व श्री. विचारे, डी. एस. गुरव उपस्थित होते.

०५४५
दानोळीतील मुलांना सह्यगिरीची मदत
असळज ः दानोळी येथील कुमार विद्यामंदिर या शाळेतील वीस विद्यार्थ्यांना सह्यगिरीमार्फत शैक्षणिक साहित्य व दप्तर वाटप करण्यात आले. या वेळी विजय भोसले, स्वाती भोसले, सह्यगिरी समन्वयक बाळासाहेब डोळे माजी सैनिक पालक उपस्थित होते. उपक्रमांतर्गत शिरोळ तालुक्यात दानोळी, पन्हाळा तालुक्यात कोलिक, पडसाळी, गगनबावडा तालुक्यात पळसंबे गाव, निगडेवाडी, असंडोली, निवडे, वेतवडे, मांडूकली, मणदूर, कोदे, पाटीलवाडी येथील ७५ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून शैक्षणिक हातभार दिला.

07225
खरीप पीक स्पर्धेत शिवाजी पाटील द्वितीय
घुणकी : राज्यस्तरीय सोयाबीन पीक स्पर्धेत येथील शिवाजी विष्णू पाटील यांनी दुसरा क्रमांक पटकाविला. श्री. पाटील यांनी यापूर्वी हातकणंगले तालुका, जिल्हा व विभागातही सोयाबीन स्पर्धेत चांगले उत्पादन घेऊन यश मिळविले होते. त्यांनी राज्यस्तरीय सोयाबीन स्पर्धेत हेक्टरी ७४ क्विंटल ६० किलो उत्पादन घेतल्याने त्यांना दुसरा क्रमांक मिळाला. दरम्यान, त्यांच्या यशाबद्दल शरद सहकारी साखर कारखान्याच्या वतीने अध्यक्ष, आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्या हस्ते दीपक शिवाजी पाटील यांचा सत्कार केला. पंचायत समितीचे माजी सदस्य मदन डाळे उपस्थित होते. त्यांना संदीप पाटील, संजय पाटील, कृषी सहायक संतोष पाटील, अविनाश मगदूम, रमेश तेली, महालक्ष्मी ॲग्रो वारणानगर, रघुनाथ पाटील, सर्जेराव माजगावकर यांचे सहकार्य लाभले.

शाहूवाडीत स्टार्टअप यात्रा
शाहूवाडी ः येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राज्य शासनाच्या स्टर्टअप यात्रेच्या माध्यमातून कौशल्य, रोजगार, उदोजकता व नावीन्यता याबाबत माहिती दिली. मोबाईल व्हॅनद्वारे चित्रफीत दाखविली. गटनिदेशक मरले यांनी स्टार्टअप यात्रेचे समुपदेशक पांढरे, राजू मुंढे, खाडे यांचे स्वागत केले. भाजपचे राजू प्रभावळकर यांनी मनोगत व्यक्त केले. शिल्पनिदेशक सवणे यांनी सूत्रसंचालन केले. कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92903 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..