शहरात धो-धो पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात धो-धो पाऊस
शहरात धो-धो पाऊस

शहरात धो-धो पाऊस

sakal_logo
By

शहरात धो-धो पाऊस
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : दिवसभर उन्हाचा तडाखा आणि रात्री जोरदार पावसाने शहर परिसराला झोडपून काढले. त्यामुळे शहरासह उपनगरातील रस्त्यांवर वीस ते पंचवीस मिनिटात पाणीच पाणी वाहू लागले. दरम्यान, या महिन्यात पुढील चार ते पाच दिवसात जोरदार पावसाची शक्‍यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
काल करवीर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात ढगफुटीसदृश पाऊश झाला. आजही दिवसभर उन्हाचे चटकेही जाणवले. परतीचा पाऊस म्हणून विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होतो. पण हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानूसार या महिन्या जोरदार तर अतिवृष्टीपर्यंत पावसाची शक्‍यत वर्तवली आहे. याचा ट्रेलर काल सांगरूळ येथील पावसाने दाखविला आहे. सध्या पडणाऱ्या पावसामुळे लोंबी आलेल्या भात भुईसपाट होण्याइतका होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

राशिवडे बुद्रुक ता. २ : आज रात्री साडेदहाच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह या परिसराला पावसाने झोडून काढले. सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे पाणीच पाणी झाले. मोठ्या थेंबाचा मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे गौरी गीते म्हणणाऱ्या महिलांच्या मांडावर परिणाम झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92904 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..