काँग्रेस निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस निवेदन
काँग्रेस निवेदन

काँग्रेस निवेदन

sakal_logo
By

47504

विमानतळावर कार्गो सुविधा सुरू करा
काँग्रेस आमदारांतर्फे मंत्री सिंधिया यांना निवेदन

उजळाईवाडी, ता. ३ ः कोल्हापूर विमानतळावर कार्गो सुविधा सुरू करावी, वाहतुकीची नवी क्षेत्रं निश्‍चित करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन आज जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदारांनी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिले. कोल्हापुरात नाईट लँडिंगला मान्यता दिल्याबद्दल श्री. सिंधिया यांचे कोल्हापुरवासीयांतर्फे आभार मानले. श्री. सिंधिया आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. विमानतळावर त्यांची काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील, प्रा. जयंत आसगावकर व श्रीमती जयश्री जाधव यांनी भेट घेऊन निवेदन दिले. नाईट लँडिंग सुविधेसाठी नाईट रुटची निश्‍चिती करावी, अशी मागणीही केली आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी आवश्‍यक असलेले सर्व निर्णय घेण्याचे आश्‍वासन श्री. सिंधिया यांनी दिल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93018 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..