यिन- शाळा सर्वेक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिन- शाळा सर्वेक्षण
यिन- शाळा सर्वेक्षण

यिन- शाळा सर्वेक्षण

sakal_logo
By

लोगो- यिन

47513

मनपा शाळांत रिक्त पदे
तत्काळ भरणे आवश्यक
‘यिन’चे सर्वेक्षण ः स्वच्छतागृहांसह वीजबिलाची समस्या
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः शहरातील महापालिका शाळांत तब्बल चाळीसहून अधिक शिक्षकांची आवश्यकता असून तेथे तत्काळ शिक्षक भरती करणे आवश्यक आहे. त्याशिवाय स्वच्छतागृहांसह विविध भौतिक सुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहेत. सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स (यिन) नेटवर्कच्या तरुणाईने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे.
महापालिकेच्या काही शाळांची पाहणी सर्वेक्षणांतर्गत केली. सरकारी प्राथमिक शाळांची गुणवत्ता चांगली असूनही पालकांचा खासगी शाळांकडील ओढा कायम आहे. महापालिकेच्या शाळांची वाढत्या उपनगरात आवश्यकता असून शहरातील कमी पटसंख्येच्या शाळा अशा ठिकाणी स्थलांतरित करणे गरजेचे आहे. काही शाळांना मैदाने आणि क्रीडा साहित्य उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. शाळांना शैक्षणिक अनुदान मिळत नसल्याने शिक्षकांना हा खर्च वर्गणी काढून करावा लागतो. शासनाकडून या शाळांना वर्षासाठी बारा हजार रुपये वीज बिलापोटी दिले जातात. मात्र, महिन्याला शाळांचे वीजबिल पाच हजारच्या पुढे येते आणि त्याचा दरही कमर्शियल दरानुसार आकारला जातो. त्यामुळे बहुतांश शाळांत वीजबिलांची ही समस्या आहे. बहुतांश शाळांच्या परिसरात रात्री मद्यपींचा त्रास वाढला आहे. त्यामुळे अशा शाळांच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारीचे उपाय करावे लागणार आहेत. पूर्ण क्षमतेने शिक्षक भरती, स्वच्छतागृहांची उभारणी, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अनुदान, पाण्याबरोबरच विजेचे बिलही माफ करणे आदी गोष्टींवर भर द्यावा लागणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
`यिन''चे मुख्यमंत्री पार्थ देसाई, मराठी भाषा मंत्री रोहन शारबिद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण झाले. त्यानंतर याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आला. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही श्री. रेखावार यांनी दिली. या वेळी ‘यिन''चे सहायक व्यवस्थापक अवधूत गायकवाड, राजलक्ष्मी कदम, शिवानी शिंदे, आफरीन नदाफ, साक्षी यादव, श्रावणी शंकरदास, मयूरी पाटील, ज्योती कपले, ओमकार साठे, निखिल जाधव, ओमकार रसाळ, विक्रमसिंह येडगे, रोहन येडगे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93047 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..