गौराई आगमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गौराई आगमन
गौराई आगमन

गौराई आगमन

sakal_logo
By

फोटो कट आऊट करणे
47509 यातील ओळी घेणे

समृद्धीच्या पावलांनी आली गौराई
पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा कोणत्याही निर्बंधाशिवाय गौराई आगमनाचा सोहळा पारंपरिक उत्साहात सजला. पंचगंगा घाट, राजाराम बंधारा, कोटीतीर्थ, रंकाळा, कळंबा आदी ठिकाणी गौराई आवाहनासाठी महिलांनी आज गर्दी केली. दरम्यान, या ठिकाणी बॅंडसह बेंजो पथकांनी हजेरी लावली.
कोरोनामुळे दोन वर्षे गर्दीवर निर्बंध होते. यंदा असे कुठलेच निर्बंध नसल्याने दुपारी बारानंतर गटागटाने महिला मोठ्या संख्येने गौरी आवाहनासाठी बाहेर पडल्या. पंचगंगा घाटावर तर दुपारी तीनपर्यंत जत्रेचेच स्वरूप आले. घाटावर गौराईंचे विधीवत पूजन झाल्यानंतर त्या कलशात घेऊन सवाद्य मिरवणुकीने घरोघरी गेल्या. तत्पूर्वी पंचगंगा घाटावर गौराईच्या खेळांचाही आविष्कार सजला. काही तरुणींनी तर घोड्यावरून गौराई घरी नेल्या.
बाप्पाच्या आगमानंनतर आता गौराईंचे आगमन झाले असून, घरोघरी स्वागत झाल्यानंतर आज त्या माहेराला विसावल्या. उद्या (शनिवारी) शंकरोबांचे आगमन होणार असून, दोघांचाही घरोघरी पाहुणचार होईल. यानिमित्ताने रात्री गौराई गीतांच्या खेळासह भानोरा हा पारंपरिक कार्यक्रमही होईल. सोमवारी (ता. ५) घरगुती गणपती-गौराईंचे विसर्जन होईल. अर्थात गौराई पुन्हा सासरी जातील.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93060 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..