उघड्या दरवाज्यातून चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उघड्या दरवाज्यातून चोरी
उघड्या दरवाज्यातून चोरी

उघड्या दरवाज्यातून चोरी

sakal_logo
By

न्यू शाहूपुरीत चोरी भरदिवसा
चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल पळविला
कोल्हापूर ः न्यू शाहूपुरी येथे उघड्या दरवाज्यातून चोरट्याने घरात प्रवेश करून गणेशोत्सवासाठी आणलेले चांदीचे दागिन्यांसह मोबाईल चोरून नेला. भरदिवसा हा प्रकार घडला. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी सांगितले, पवन संकपाळ न्यू शाहूपुरी येथे राहतात. चोरट्याने उघड्या दरवाज्यातून घरात प्रवेश करून गणेशोत्सवासाठी आणलेल्या चांदीच्या दोन मूर्ती, उंदीर, करंडा यासह मोबाईल असा एकूण ४५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून केला. काल सकाळी सहा ते सायंकाळी सात या दरम्यान हा प्रकार घडला. याबाबतची फिर्याद संकपाळ यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.

रुग्णवाहिकेतून व्हेंटिलेटरची चोरी
कोल्हापूर ः न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्च परिसरात उभ्या असणाऱ्या रुग्णवाहिकेतील दीड लाखांहून अधिक किमतीचा व्हेंटिलेटर चोरट्याने चोरून नेला. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी सांगितले की, न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्च परिसरात २६ ते २८ ऑगस्टदरम्यान एक रुग्णवाहिका उभी होती. यामधील १ लाख ५४ हजार ९९९ रुपये किमतीचा व्हेंटिलेटर चोरट्याने चोरून नेला. अशी फिर्याद रजनीकांत चोले यांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.


संभापूरच्या एकाची आत्महत्या
पेठवडगाव : पुणे-बंगळुरू महामार्गजवळ मंगरायाचीवाडी येथे तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सायंकाळी उघडकीस आली. तानाजी भोपाल कारंडे (वय २८, संभापूर, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. तानाजी कारंडे यास दारूचे व्यसन होते. महामार्गाशेजारील एका हॉटेलसमोरच्या शेतात झाडाला तानाजी याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तानाजी याचा भाऊ दत्तात्रय याने वर्दी दिली आहे. पेठवडगाव पोलिसांत नोंद झाली असून पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल घोडके तपास करीत आहेत.

राजारामपुरीतील वृद्धाचा मृ्त्यू
कोल्हापूर ः कुवारबाव रेल्वे स्टेशनवर बेशुद्धावस्थेत पडलेल्या वृद्धाला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अजित मधुसुदन पुनाळे (वय ६५, राजारामपुरी, कोल्हापूर) असे वृद्धाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २) दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुनाळे हे दोन्ही पायाने अशक्त असल्याने बेशुद्धावस्थेत २८ ऑगस्टला कुवारबाव रेल्वे स्टेशनवर सापडले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते; मात्र शुक्रवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. टेकाडे यांनी शहर पोलिस ठाण्यात ही माहिती दिली. खबरीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलिस हवालदार जाधव करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93073 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..