जाहिरात- चंदूकाका सराफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात- चंदूकाका सराफ
जाहिरात- चंदूकाका सराफ

जाहिरात- चंदूकाका सराफ

sakal_logo
By

कोल्हापूर व सांगलीसाठी

चंदुकाका सराफतर्फे
ठुशी महोत्सव

पारंपारिकतेला नाविन्‍याची जोड देणाऱ्या ठुशी
कोल्हापूर, ता. ३ ः सतत नाविन्‍याचा शोध घेत १८२७ पासून ग्राहकांना वैविध्‍यपूर्ण दागिने उपलब्ध करून देणाऱ्या चंदूकाका सराफ ॲन्‍ड सन्‍सच्या ठुशी महोत्सवाला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. पारंपारिकतेला नाविन्‍याची जोड देत, ट्रेंडी डिझाईन्‍सचा सुरेख संगम असणाऱ्या ‍ठुशी महोत्‍सवात उपलब्ध आहेत.
ठुशी हा तसा पारंपारिक दागिना. पण काळाच्या ओघात लुप्त होणारी आपली परंपरा चंदुकाका सराफ ॲन्‍ड सन्‍स यांनी केवळ जपलेलीच नाही तर तिला आजच्या काळातला मॉडर्न लूकही दिला आहे. सोनं व फॉर्मिंग अशा दोन प्रकारांमध्ये नावीन्यपूर्ण श्रेणी महिलांसाठी उपलब्ध आहे. ज्यांना पारंपारिक ठुशीची हौस आहे, ती या महोत्सवात पूर्ण होणार आहे तर आजच्या आधुनिक काळातील महिला व युवतींना आवडतील अशा डिझाइनर ठुशीही येथे उपलब्ध आहेत. पारंपारिक साडी किंवा ड्रेसवर परिधान करता येतील अशी या ठुशीची डिझाईन्स आहेत. या ठुशीसोबतच मॅचिंग कानातले, बांगड्या, मोहनमाळ आणि नथ असा संपूर्ण ‘ठुशी सेट'' उपलब्ध करून दिला आहे. महोत्सवातील दोन दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घडणावळीवर पाच टक्के सवलत तर तीन दागिने खरेदी करणाऱ्यांना पंधरा टक्के सवलत देण्यात येणार आहे. फॉर्मिंग ठुशीसाठी ५९९ ते ७९९ च्या खरेदीवर पाच टक्के तर त्यापुढील खरेदीवर दहा टक्के सवलत आहे. एसबीआय क्रेडिट कार्डवरून खरेदी करणाऱ्यांना अतिरिक्त पाच टक्के सवलतही लागू आहे. महाराष्‍ट्र व कर्नाटकातील नजिकच्‍या शोरूमला भेट खरेदीचा आनंद घ्‍या, असे आवाहन पेढीने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93101 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..