अभिनयांतिक पुस्तकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनयांतिक पुस्तकाचे प्रकाशन
अभिनयांतिक पुस्तकाचे प्रकाशन

अभिनयांतिक पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By

47521

कलाकार सामाजिक
बांधिलकी जपतात
डॉ. माळी; ‘अभिनयांकित’ पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर, ता. ३ : ‘‘कलाकार हे समाजाचेच एक घटक आहेत. ते जसे नाट्य, चित्रपट, मालिकांत भूमिका साकारतात. त्याच पद्धतीने ते सामाजिक बांधिलकीही जपत असतात,’’ असे डॉ. जी. पी. माळी यांनी सांगितले.
सिने नाट्य दिग्दर्शक, खलनायक नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या ३७ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची कन्या, ज्येष्ठ लेखिका जयश्री दानवे लिखित ‘अभिनयांकित’ पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ. माळी, कमला कॉलेजचे मराठी विभागप्रमुख डॉ. सुजय पाटील यांच्या हस्ते झाले. ‘सकाळ’ प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
डॉ. माळी म्हणाले, ‘अभिनयांकित’ पुस्तकात १६ अभिनेत्यांचा प्रवास साकारला आहे. नट, कलावंत म्हणून ते श्रेष्ठ आहेतच; पण ते सामाजिक बांधिलकी जपतात, हे महत्त्वाचे आहे.’ डॉ. हिर्डेकर म्हणाले, ‘‘नटश्रेष्ठ दानवे यांनी दिलेला वारसा जयश्री आणि राजदर्शन या भावंडांनी जपला आहे. कलावंतांची अशी पुस्तके यायला हवीत; कारण नट, कलाकार म्हणून ते वावरत असताना आताच्या पुढील पिढीला तो माहीत असला पाहिजे.’’
जयश्री दानवे म्हणाल्या, ‘‘आपण जे दिग्दर्शक, कलाकार पाहतो, ते नटश्रेष्ठ दानवे यांच्या अथक तालमीत घडले आहेत.’’ यात दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, सदाशिव अमरापूरकर, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, सुबोध भावे, प्रशांत दामले, डॉ. गिरीश ओक, भारत जाधव, अविनाश व ऐश्‍वर्या नारकर, महेश कोठारे, सचिन खेडेकरापर्यंत रंगकर्मींनी ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार’ स्वीकारला. या सर्व कलाकारांना जवळून भेटता आले, जाणून घेता आले, यासाठी कलाकारांच्या जीवनाचा, अभिनयाचा आढावा ‘अभिनयांकित’ पुस्तकात मी घेतला आहे. राजदर्शन दानवे यांनी आभार मानले. सुधीर पेटकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93114 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..