ह्रदय बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ह्रदय बंद
ह्रदय बंद

ह्रदय बंद

sakal_logo
By

देव तारी, त्याला कोण मारी!
डॉक्टरांसमोरच हृदय बंद ः डॉ. आडनाईक यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः नियमित तपासणीसाठी आलेल्या आणि डॉक्टरांसमोरच बसलेल्या रुग्णांचे हृदयच अचानक बंद पडले. स्वास्तिक हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला; पण डॉ. अर्जुन आडनाईक यांच्या समयसुचकतेमुळे रुग्णाचे प्राण वाचले. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीची प्रचित यातून आली.
त्याचे झाले असे, या रुग्णाचे हृदय ३५ टक्केच काम करत होते. त्यांच्यावर बारा वर्षांपूर्वी पेसमेकर बसवण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. १२ वर्षांनी पेसमेकर बदलावा लागतो, तो न बदलल्याने संबंधित रुग्णाला गेल्या दोन दिवसांपासून चक्कर येणे, धाप लागणे यांसारखा त्रास सुरू झाला होता. यातून संबंधिताचे हृदय केव्हाही बंद पडण्याचा धोका होता.
आज हा रुग्ण एका नातेवाईकासह डॉ. आडनाईक यांच्याकडे नियमित तपासणी व सल्ला घेण्यासाठी आले होते. डॉक्टरांच्या समोरच्या खुर्चीत ते बसले होते. डॉक्टरांशी चर्चा सुरू असतानाच अचानक हा रुग्ण खुर्चीत कोसळला. त्यावेळी त्यांचे हृदय बंद पडल्याचे डॉ. आडनाईक यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने रुग्णाच्या छातीवर हलका मार देऊन हृदयाचे बंद पडलेले ठोके पुन्हा चालू केले. नंतर त्याच्यावर कॅथलॅबमध्ये शस्त्रक्रिया करून तत्पुरता पेसमेकर बसवला. त्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधारली; पण पहिल्या चार सेकंदांतच डॉ. आडनाईक यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांचे प्राण वाचले. डॉ. आडनाईक यांच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला.


असा प्रकार कोणाच्याही बाबतीत होऊ शकतो. एखाद्या रुग्णाचे हृदय बंद पडले तर पहिल्या चार सेकंदांत त्याच्या हृदयावर हलके ठोसे मारले तर संबंधिताचे हृदय पुन्हा सुरू होऊ शकते. त्यामुळे अशा स्थितीत पहिले चार सेकंद महत्त्वाचे असतात. सर्वांनी हे शिकून घेतले तर घरातील कोणाच्याही बाबतीत असे काही घडले तर त्याचा जीव वाचला जाऊ शकतो.
- डॉ. अर्जुन आडनाईक, स्वास्तिक हॉस्पिटल, कोल्हापूर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93128 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..