देखावे वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देखावे वातावरण
देखावे वातावरण

देखावे वातावरण

sakal_logo
By

47613

गौराई आगमनाबरोबरच देखावेही खुले
गणेश उत्सव; कलात्मक मूर्ती; मंदिरांच्या प्रतिकृतींबरोबरच प्रबोधनपर तांत्रिक, सजीव देखाव्यांवर भर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः यंदाच्या गौराई आगमनाबरोबरच आता सार्वजनिक मंडळांचे देखावेही खुले होऊ लागले आहेत. जुना बुधवार पेठेतील हायकमांडो फ्रेंडस सर्कलचा ‘मतदारराजा जागा हो’ हा देखावा आजपासून खुला झाला तर कपिलतीर्थ येथील मित्रप्रेम मित्रमंडळाच्या ‘फक्त संभाजीनगरच’ या सजीव देखाव्याला उद्या (रविवार) पासून प्रारंभ होणार आहे. गेली दोन वर्षे देखाव्यांवर निर्बंध होते. त्याशिवाय शनिवार, रविवारचा मुहूर्त साधून मंडळांनी देखावे खुले करण्यावर भर दिला आहे. दरम्यान, पावसामुळे आज दुपारी कार्यकर्त्यांची काही काळ तारांबळ उडाली; पण लगेचच त्यांची देखाव्याची तयारी सुरू झाली.
हायकमांडो फ्रेंडस सर्कलच्या देखाव्याचे उदघाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. नेहमीच गर्दी खेचणाऱ्या कपिलतीर्थ येथील मित्रप्रेम मंडळाने यंदा छत्रपती संभाजी महाराज, औरंगजेब आणि एकूणच इतिहासावर भाष्य करणारा सजीव देखावा साकारला आहे.
राजारामपुरी परिसरात काल्पनिक मंदिरांच्या प्रतिकृतींबरोबरच तांत्रिक देखावे असून शिवाजी उद्यमनगरातही तांत्रिक देखाव्यांवर भर आहे. मंगळवार पेठ, शिवाजी पेठेत सजीव देखाव्यांची परंपरा यंदाही कायम असून या परिसरातही मंदिरांच्या प्रतिकृतींवर भर दिला आहे. मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाचा ‘जालियनवाला बाग हत्याकांड’ या विषयावर आधारित सजीव देखावा सोमवारी (ता. ५) सायंकाळी सात वाजता खुला होणार आहे.

सळसळता उत्साह
दोन वर्षे उत्सवावर निर्बंध असल्याने देखावेही नव्हते. त्यामुळे लोकांना देखावे पाहण्याचा आनंद घेता आला नव्हता. यंदा मात्र उत्सवात पहिल्या दिवसापासूनच सळसळता उत्साह असून आजपासूनच सहकुटुंब लोक मूर्ती व देखावे पाहण्यासाठी बाहेर पडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी करमणुकीची साधने (ॲम्युझमेंट पार्क) आणि खाद्यपदार्थांच्या गाड्याही सज्ज झाल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93145 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..