पर्यायी मार्गाची पहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यायी मार्गाची पहाणी
पर्यायी मार्गाची पहाणी

पर्यायी मार्गाची पहाणी

sakal_logo
By

पर्यायी मार्ग, पार्किंगस्थळांची चाचपणी
पोलिस अधीक्षकांकडून पाहणी; कोळेकर तिकटी ते इंदिरासागर चौक मार्गाचाही विचार; मंडळांचाही प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गाऐवजी आम्हाला पर्यायी मार्ग द्या, अशा मंडळांच्या मागणीचा विचार करून दोन पर्यायी मार्गाची पाहणी आज पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केली. टायटन शोरूम चौक, हॉकी स्टेडियम, संभाजीनगरमार्गे क्रशर चौक या मार्गाबरोबर कोळेकर तिकटी ते इंदिरासागर चौक या नव्या मार्गाचाही विचार केला गेला. दरम्यान, निर्माण चौक मैदान आणि रावजी मंगल कार्यालयासमोरील मोकळ्या जागेची पार्किंगसाठी पाहणी केली.
मिरजकर तिकटी, बिनखांबी, पापाची तिकटी, गंगावेस हा मुख्य गणेश विसर्जनाचा मार्ग आहे. राजारामपुरीतील गणेश आगमनाच्या मिरवणुकीचे स्वरूप पाहिल्यानंतर मुख्य विसर्जन मिरवणुकीवर ताण पडणार, हे स्पष्ट झाले. मिरवणुकीत तासंन्‌तास अडकण्यापेक्षा आपल्याला पर्यायी मार्ग द्या, अशी मागणी अनेक मंडळांनी केली. यामध्ये शाहूपुरी, राजारामपुरी, उद्यमनगर, प्रतिभानगर, सम्राटनगर, जवाहरनगर, मंगळवारपेठ, शिवाजी पेठ आदींचा समावेश होता. त्यामुळे पर्यायी मार्गाची चाचपणी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले होते.
जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या पुढाकारातून पर्यायी मार्गाची निवड केली. यामध्ये टायटन शोरूम चौक, सुभाषनगर रोड, सावित्रीबाई हॉस्पिटल, मंडलिक वसाहत चौक, हॉकी स्टेडियम, इंदिरासागर चौक, संभाजीनगर चौकमार्गे क्रशर चौक हा पर्याय पुढे आला. त्याचबरोबर मंगळवार पेठ, शिवाजी पेठ आणि परिसरातील मंडळांसाठी कोळेकर तिकटी ते इंदिरासागर चौक मार्गाचाही विचार केला. दोन्ही मार्गांची आज पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पाहणी केली. या मार्गावर वाहनांच्या पार्किंगसह, हातगाडीसाठी कोणती जागा निश्चितीबाबत विचार झाला. यामध्ये निर्माण चौक आणि रावजी मंगल कार्यालयासमोरील मोकळ्या जागेचा विचार झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93149 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..