तिरूपती दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिरूपती दर्शन
तिरूपती दर्शन

तिरूपती दर्शन

sakal_logo
By

47592,,
47593
बेळगाव-तिरूपती
पॅकेज टूर सुरू होणार
कर्नाटक पर्यटन विभागाकडून बससेवा

सकाळ वृत्तसेवा
बेळगाव, ता. ३ ः बेळगाव व हुबळी-धारवाड येथून तिरूपती तिरूमला तत्काळ दर्शन पॅकेज टूर सेवा सुरू करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी महामंडळाला बेळगाव महापालिकेची मदत हवी आहे. या टूर पॅकेजच्या नोंदणीसाठी ‘बेळगाव वन’ कार्यालयात एक काऊंटर उपलब्ध करून देण्याची विनंती महामंडळाने महापालिकेकडे केली आहे. ‘ऐरावत क्लब क्लास’ बसमधून भक्तांना तिरूपतीला नेले जाणार आहे, त्या वाहनांच्या पार्किंगसाठी जागा, पिक अप पॉईंट व प्रतीक्षालयासाठाही जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
पर्यटन विकास महामंडळाकडून सध्या बंगळूर येथून तिरूपती तिरूमला तत्काळ सेवा ‘दर्शन पॅकेज टूर’चे आयोजन केले जाते. त्याला भक्तांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पॅकेज टूरमधून गेल्यानंतर तत्काळ दर्शनही मिळते. ही सेवा उत्तर कर्नाटकातील बेळगाव व हुबळी-धारवाड या दोन शहरांमधून सुरू केली जावी, अशी सूचना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळाला केली होती. त्यानुसार महामंडळाने दोन्ही शहरातून ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि गोव्यातून तिरूपतीला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हे भाविक कोल्हापुरातून ‘हरीप्रिया एक्स्प्रेस’ने जातात. त्यांनी तिकीट, दर्शन व निवास यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागते; पण निवासाची व्यवस्था होत नाही, अशा भाविकांसाठी ही ‘पॅकेज टूर’ फायदेशीर ठरू शकते.

सेवा कोल्हापूरपर्यंत नेल्यास फायदेशीर
तिरूपती दर्शनानंतर भाविक कोल्हापूर येथे जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतात. त्यामुळे ही ‘पॅकेज टूर’ कोल्हापूरपर्यंत विस्तारीत केल्यास फायदेशीर ठरू शकते. त्याचा निर्णय पर्यटन विकास महामंडळाला घ्यावा लागणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93188 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..