मनपा शिक्षक पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा शिक्षक पुरस्कार
मनपा शिक्षक पुरस्कार

मनपा शिक्षक पुरस्कार

sakal_logo
By

47838, 47839, 47842, 47845, 47846, 47848, 47850, 47852,

मनपाचे आदर्श शिक्षक-शिक्षकेतर पुरस्कार जाहीर
कोल्हापूर, ता. ४ ः महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे शिक्षक दिनानिमित्त यंदाचे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक-शिक्षकेतर पुरस्कार जाहीर झाले. महापालिका शाळांतून लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरमधील सुजाता संजय खोत, वर्षा संभाजी पाटील, ज्योती संदीप उबाळे यांची तर खासगी अनुदानित शाळांतील विजय सदाशिव नाईक (तेजस मुक्त विद्यालय), राजारामपुरीतील नेहरू विद्यालयातील सायली जगन्नाथ पाटील, रजनी सुदाम कोळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले. आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार मनोहर शंकर शिंदे व संभाजी शंकर कबाडे यांना जाहीर झाला.
महानगरपालिका व खासगी अनुदानित शाळांतील ज्या शिक्षकांनी शैक्षणिक, सामाजिक, विविध उपक्रम, स्पर्धा यात उल्लेखनीय कामगिरी बजावून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. पुरस्कारासाठी महापालिकेच्या ४ व खासगी अनुदानित ४ शाळातील मुख्याध्यापक-सहायक शिक्षकांनी ११ प्रस्ताव सादर केले होते. प्रशासकांच्या सूचनेनुसार उपायुक्त शिल्पा दरेकर, डाएटचे प्राचार्य डॉ. आय. ली. शेख, प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार, दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव प्रा. प्रभाकर हेरवाडे, पर्यवेक्षक विजय माळी यांची पुरस्कार समिती स्थापन केली होती. प्रस्ताव पाठवलेल्या शिक्षकांच्या मुलाखती घेऊन गुणांकन केले. त्यानुसार आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पुरस्काराकरिता निवड केली. प्राथमिक शिक्षण समितीने २०१९-२०२०, २०२०-२१, २०२१-२२ या तीन वर्षीचे पुरस्कार जाहीर केले आहेत. जाहीर पुरस्कार पूरस्थिती, विधानसभा आचारसंहिता, परीक्षा मूल्यांकन, कोरोना, लॉकडाउनमुळे स्थगित केले होते. या वर्षात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या निर्देशानुसार घेण्यात येईल, असे उपायुक्त दरेकर यांनी सांगितले.

आदर्श शिक्षक
मनपा शाळा
सुजाता संजय खोत
वर्षा संभाजी पाटील
ज्योती संदीप उबाळे
(सर्व लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर)
.....
खासगी अनुदानित शाळा
विजय सदाशिव नाईक (तेजस मुक्त विद्यालय)
सायली जगन्नाथ पाटील
रजनी सुदाम कोळी (दोन्ही नेहरू विद्यालय राजारामपुरी)
....
आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार
मनोहर शंकर शिंदे (सावित्रीबाई फुले विद्यामंदिर)
संभाजी शंकर कबाडे (लोणार वसाहत विद्यामंदिर)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93219 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..