अपयशाची भिती मोडून काढा; प्रकाश मोरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपयशाची भिती मोडून काढा; प्रकाश मोरे
अपयशाची भिती मोडून काढा; प्रकाश मोरे

अपयशाची भिती मोडून काढा; प्रकाश मोरे

sakal_logo
By

47667
गडहिंग्लज : गडहिंग्लज युनायटेडतर्फे खेळाडूंशी संवाद साधताना प्रकाश मोरे. व्यासपीठावर महादेव पाटील, मल्लिकार्जुन बेल्लद, सुरेश कोळकी.
(आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

अपयशाची भीती मोडून काढा
प्रकाश मोरे; गडहिंग्लज युनायटेड फुटबॉलतर्फे खेळाडूंशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : स्पर्धा असो की परीक्षा दडपण हे असणारच. त्याला न घाबरता मनापासून घेतलेल्या तुमच्या मेहनतीवर विश्‍वास ठेवा. अपयशाची भीती मोडून काढत सर्वोच्च कामगिरीच्या जिद्दीने प्रयत्नांची शिकस्त करा. यश तुम्हाला नक्की सलाम करेल, असा सल्ला आयर्न मॅन उद्योजक प्रकाश मोरे यांनी दिला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे ‘आयर्न मॅन स्पर्धा एक अनुभव’ याविषयी खेळाडूंशी संवाद साधला. एम. आर. हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील होते.
सुरुवातीला युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात खेळाची पार्श्‍वभूमी नसताना पंचेचाळीशीनंतर मोरेंचे यश प्रेरणादायक असल्याचे सांगितले. आयर्न मॅन स्पर्धेतील यशाबद्दल युनायटेडचे अध्यक्ष मलिकार्जुन बेल्लद यांच्या हस्ते मोरे यांचा गौरव करण्यात आला.
मोरे आपला प्रवास उलगडताना म्हणाले, ‘‘वयाच्या चाळीशीत आई आणि पत्नी यांच्या टीकेमुळे फिट राहण्यासाठी खेळाकडे वळलो. सुरुवातीला धावण्यावर भर दिला. बेळगाव अर्धमॅरेथॉन स्पर्धेतील यशाने उत्साह वाढला. इंटरनेट आणि तज्ज्ञाच्या सल्याने वैज्ञानिकदृष्ट्या सरावावर भर दिला. रस्त्यावर धावून, तलावात पोहून तयारी केली. स्पर्धेत ऐनवेळी आजारी पडल्याने कामगिरीवर परिणाम झाला; पण चिकाटीने स्पर्धा पूर्ण करण्याचा निश्‍चय करत यश खेचून आणले. खेळाडूंनी सरावाइतकेच आहार आणि व्यायामावर भर देण्याची गरज आहे. बिट, दूध, दही, अंडी, पालेभाज्या, कडधान्ये, लिंबू सरबत, फळे ही अत्यल्प दरातील ऊर्जा देणारे स्त्रोत आहेत.’’ या वेळी प्रशांत दड्डीकर, मनीष कोले, अभिजित चव्हाण, डॉ. उदय कोळी, यासीन नदाफ, सौरभ जाधव यांच्यासह खेळाडू, पालक उपस्थित होते. संचालक सुरेश कोळकी यांनी आभार मानले.

चौकट..
खेळाडूंना टिप्स
- मेहनतीत सातत्य ठेवा
- पालेभाज्या, कडधान्यावर भर द्या
- दुखापतीत सराव टाळा
- सराव, आहार, विश्रांतीचा मेळ घाला
- सुरक्षा उपकरणे सक्तीने वापरा
- वॅार्मअप, स्ट्रेचिंग गांभीर्याने करा

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93221 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..