मिरची, दोडक्याचे दर वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरची, दोडक्याचे दर वाढले
मिरची, दोडक्याचे दर वाढले

मिरची, दोडक्याचे दर वाढले

sakal_logo
By

47672
गडहिंग्लज : आठवडा बाजारात अद्याप भाजीपाल्याचा तुटवडा असल्याने दर तेजीत आहेत. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)

मिरची, दोडक्याचे दर वाढले
टोमॅटो वधारला; गणेशोत्सवामुळे फळांना मागणी, ओला भुईमूग दाखल
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : येथील भाजी मंडईत हिरवी मिरची, दोडका, बिन्सचे भाव कमी आवकेमुळे वाढले आहेत. गेले दोन महिने घसरलेला टोमॅटोचा भाव वधारला आहे. दहा किलोमागे शंभर रुपयांनी दर अधिक झाला आहे. गणेशोत्सवामुळे फळांना मागणी कायम आहे. मटण मार्केटमध्ये ग्राहकाअभावी उलाढाल थंड आहे. जनावरांच्या बाजारात म्हशींची आवक चांगली आहे.
गेला आठवडाभर गणेशोत्सावामुळे भाजी मंडईत मागणी अधिक आहे. गेला महिना श्रावण आणि पाठोपाठ गणेशोत्सव यामुळे ही तेजी टिकून असल्याचे तालुका भाजीपाला संघाचे महादेव तराळ यांनी सांगितले. त्यामुळे मटण मार्केटमध्ये ग्राहकच नसल्याने उलाढाल मंदावली आहे. पालेभाज्यांचा अद्याप तुटवडा असल्याने दर जास्त आहेत. शेपू, पालक, मेथी, कोंथिबिर यांच्या पेंडींचा दर १० ते १५ रुपये असा आहे. फळभाज्यांनाही मागणी आहे. हिरवी मिरची, बिन्स, दोडका यांचा दहा किलोचा दर ५०० रुपयापर्यंत वधारला आहे. परिणामी किरकोळ बाजारात ८० रुपये किलो असा भाव आहे. टोमॅटोच्या दरात दहा किलोमागे शंभर रुपयांनी दर वाढले आहेत.
बाजारात ओला भुईमूग दाखल झाला आहे. ऐंशी रुपये किलो असा दर आहे. फळबाजारात गेल्या सव्वा महिन्यापासून तेजीचे चित्र आहे. हिमाचल प्रदेशच्या सफरचंदाची आवक अधिक असल्याने दर कमी आहेत. शंभर रुपये किलो असा दर आहे. पेरू, डाळींब, मोसंबी ६० ते ८० रुपये किलो आहेत. पपई, किवी, अननस यांचीही आवक आहे. जनावरांच्या बाजारात म्हशींची आवक असून मागणीमुळे दरही आहेत. २५ ते ९० हजारांपर्यंत दर असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. सुमारे ७० हून अधिक आवक झाली होती. शेळ्यामेंढ्याची ८० आवक होऊन ५ ते १५ हजारांपर्यंत दर होते.
------------
चौकट...
वांगी घसरली
गणेशोत्सवात फळभाज्यांना मागणी असली तरी वांगी टाळली जातात. त्यामुळे या आठवड्यात वांग्याचा दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. दहा किलोचा नीचांकी ७० रुपये असा घाऊक बाजारात दर होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93230 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..