अत्याळमध्ये नेत्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अत्याळमध्ये नेत्रदान
अत्याळमध्ये नेत्रदान

अत्याळमध्ये नेत्रदान

sakal_logo
By

47722
आनंदीबाई पाटील

अत्याळमध्ये नेत्रदान
---
पाटील कुटुंबीयांची सामाजिक बांधिलकी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील आनंदीबाई बापूसाहेब पाटील यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. अत्याळ गावातील हे ३१ वे, तर चळवळीतील ७६ वे नेत्रदान ठरले. चळवळीत गेल्या चार दिवसांतील दुसरे नेत्रदान आहे.
आनंदीबाई पाटील यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. पाटील कुटुंबीयांचा नेत्रदान चळवळीत सक्रिय सहभाग आहे. त्यांनी आनंदीबाई यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर येथील अंकुर सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटलच्या पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने अत्याळ येथे येऊन नेत्रगोल घेण्याची प्रक्रिया पार पाडली.
दरम्यान, सरोळी (ता. आजरा) येथील पार्वती ऊर्फ सुभद्रा देसाई यांचे गुरुवारी (ता. १) नेत्रदान झाले होते. आनंदीबाई यांच्या रूपाने चार दिवसांत दुसरे नेत्रदान झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ‘बीएसएनएल’चे निवृत्त कर्मचारी विजय पाटील, पोलिस हवालदार दत्तगुरू पाटील, ‘गोकुळ’चे सहायक व्यवस्थापक रामकृष्ण पाटील यांच्या त्या आई होत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93258 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..