कोल्हापूरी फेट्याने गोविंदांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूरी फेट्याने गोविंदांचा गौरव
कोल्हापूरी फेट्याने गोविंदांचा गौरव

कोल्हापूरी फेट्याने गोविंदांचा गौरव

sakal_logo
By

47815
गडहिंग्लज : मुश्रीफ फाउंडेशनतर्फे शहरातील संघर्ष ग्रुपच्या गोविंदा पथकाचा गौरव करताना हसन मुश्रीफ. शेजारी सतीश पाटील, किरण कदम, सुरेश कोळकी, वसंत यमगेकर, उदय जोशी आदी.

कोल्हापूरी फेट्याने गोविंदांचा गौरव
हसन मुश्रीफ फौंडेशन; संघर्ष, पालकर मंडळाचे गोविंदा पथक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : हसन मुश्रीफ फाउंडेशनतर्फे येथील संघर्ष ग्रुप व नेताजी पालकर व्यायामशाळेच्या गोविंदा पथकांतील कार्यकर्त्यांचा कोल्हापूरी फेटे बांधून गौरव करण्यात आला. आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सर्व गोविंदांचा सत्कार झाला.
पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी धनंजय महाडिक युवाशक्तीची दहीहंडी संघर्ष ग्रुपने, तर गडहिंग्लजमधील हिरण्यकेशी फाउंडेशनची सर्वात मोठी दहीहंडी नेताजी पालकर व्यायाम शाळेने फोडल्याबद्दल या दोन्ही गोविंदा पथकांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
या वेळी विविध स्पर्धेत यश प्राप्त खेळाडूंचाही गौरव झाला. जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत यश मिळविलेल्या श्रीनिका हंजी, अभिरा हंजी, अर्णव कदम, सुवर्णलक्ष राष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल साक्षी रामणकट्टी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. जि. प.चे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, किरण कदम, उदय जोशी, सुरेश कोळकी, वसंत यमगेकर, शारदा आजरी, सिद्धार्थ बन्ने, हारुण सय्यद, रामगोंडा उर्फ गुंडू पाटील, महेश सलवादे, दिपक कुराडे, अमर मांगले, बाळासाहेब घुगरे, रमजान अत्तार, आशपाक मकानदार, राहूल शिरकोळे, रमेश पाटील-गिजवणेकर, विष्णू केसरकर आदी उपस्थित होते.

चौकट...
आता ठाणे, मुंबई गाजवावी
मुश्रीफ म्हणाले, ‘‘गडहिंग्लजच्या गोविंदा पथकांनी आता ठाणे, मुंबई येथील मोठमोठ्या दहीहंडी फोडण्यासाठी पुढे येवून गडहिंग्लजचे नाव उज्ज्वल करावे. शहराला फुटबॉल खेळाची परंपरा असून गोविंदा पथकाने केलेल्या कार्याबद्दल गडहिंग्लज शहर आता राज्यात गोविंदा पथकांचे शहर म्हणून ओळखले जाईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93262 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..