गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

गडहिंग्लज प्रशालेत सुशीलादेवी साळुंखे जयंती
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांची जयंती साजरी झाली. प्राचार्य पंडित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. प्रा. महाजन यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. मुख्याध्यापक विजय कांबळे, आप्पासाहेब शिंदे, वसतिगृह अधीक्षक तुकाराम भोसले, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. चंद्रकांत देसाई, एस. आर. नाईक, मंगल कांबळे यांची भाषणे झाली. एस. पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. पाटील यांचे अध्यक्षीय भाषण झाले. एम. बी. कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. सी. एस. कुंभार यांनी आभार मानले.
----------------
घाळी महाविद्यालयात ‘अग्निवीर’ मार्गदर्शन
गडहिंग्लज : येथील घाळी महाविद्यालयाचा राष्ट्रीय छात्रसेना व क्रीडा विभाग, आजी-माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनतर्फे ‘अग्निवीर’ मार्गदर्शन कार्यशाळा झाली. पहिल्या सत्रात निवृत्त नायब सुभेदार लक्ष्मीकांत हंडे, तर दुसऱ्या सत्रात ऑर्डनरी कॅप्टन बळिराम पाटील यांनी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य प्रा. ए. बी. उंदरे अध्यक्षस्थानी होते. प्रा. विकास अतिग्रे यांनी प्रास्ताविक केले. सानिका नाविलकर, ओंकार कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल मगर यांनी आभार मानले. एनसीसीचे लेफ्टनंट आश्‍विन गोडघाटे, सुनील देसाई, सैनिक संघटनेचे कुमार पाटील यांचे सहकार्य मिळाले. संजय जाधव, दादासाहेब पाटील, शंकर चव्हाण, सुरेश जावळे, बाळू पोवार आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93282 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..