बावडा गणेशोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बावडा गणेशोत्सव
बावडा गणेशोत्सव

बावडा गणेशोत्सव

sakal_logo
By

पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांवर बावड्यात भर
---
आजपासून खुले होणार; आकर्षक मूर्तीबरोबरच प्रतिकृतीही आकर्षण
कसबा बावडा, ता. ४ ः सजीव देखाव्यातून समाजप्रबोधनाची मोठी परंपरा असलेल्या येथील गणेशोत्सव मंडळांनी या वर्षी पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांबरोबरच समाजप्रबोधनपर देखाव्यावर भर दिला आहे. काही मंडळांच्या आकर्षक गणेशमूर्ती, तर काही मंडळांनी उभारलेल्या परराज्यांतील मंदिराच्या प्रतिकृती या वर्षीच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असेल. उद्या (ता. ५)पासून काही सजीव देखावे पाहण्यास खुले होत आहेत; तर काही देखावे मंगळवार (ता. ६)पासून खुले होतील.
देखाव्याच्या माध्यमातून नेहमीच समाजप्रबोधनाचा वसा घेतलेल्या चौगले गल्लीच्या भारतवीर मित्रमंडळाने यावर्षीचा देखावा दिव्यांगांना समर्पित केला आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या शीर्षकाखाली सादर होणाऱ्या या देखाव्यात दिव्यांगत्वावरही मात करून आनंदी जीवन जगणाऱ्यांचा प्रवास दाखविला आहे. यात ७५ कलाकार सहभागी होत आहेत. भव्य स्टेज, आकर्षक नेपथ्य आणि पटकथेसाठी प्रसिद्ध असलेल्या पाटील गल्लीतील छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ यावर्षी ऐतिहासिक ‘छत्रपती शासन’ या सजीव देखाव्याच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय घडामोडी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शासन व्यवस्था यांची तुलना केली आहे.
मुंबईहून खास आकर्षण असलेली मूर्तीची प्रतिष्ठापना सस्पेन्स स्पोर्टस असोसिएशनने केली आहे. ठोंबरे गल्ली येथील जय शिवराय मित्रमंडळाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकताना त्यांनी गड-किल्ल्यासाठी केलेल्या कामाची दखल घेतली आहे. रणदिवे गल्लीच्या बिल्वदल मित्रमंडळाने रायनासोर हा तांत्रिक देखावा सादर केला आहे.
ऐतिहासिक देखाव्याच्या माध्यमातून कोंडोजी फर्जंद यांच्या कार्याला झेंडा चौक मित्रमंडळाने सजीव देखाव्याच्या माध्यमातून उजाळा दिला आहे. प्रदूषणावर आधारित देखावा वाडकर गल्लीच्या शिवाजी तरुण मंडळाने, तर चव्हाण गल्लीच्या सम्राट मित्रमंडळाने केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारून लोकांचे लक्ष वेधले. सावरकर कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने रावणाचा वध करणारी गणेशमूर्ती साकारली आहे.
आदमापूरच्या बाळूमामांच्या जीवनावरील देखावा वाडकर गल्लीच्या मनोरंजन तरुण मंडळाने सादर केला. स्वस्तिक मित्रमंडळाने बहीण-भावाच्या नात्यावर आधारित ‘चित्ती असावे समाधान’ देखावा केला आहे. ॲम्बोज ग्रुप, भगतसिंग वसाहत यांनी वटपौर्णिमेचा देखावा केला. अजिंक्यतारा मित्र यांनी भुताची गुहा साकारली आहे. बैलगाडी शर्यतीतील थरार हा तांत्रिक देखावा अण्णा भाऊ साठे तरुण मंडळाने साकारला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93342 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..