आजरा हायस्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा हायस्कूलचे यश
आजरा हायस्कूलचे यश

आजरा हायस्कूलचे यश

sakal_logo
By

ajr43.jpg
आजरा : यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी, सचिव रमेश कुरुणकर, मुख्याध्यापक शिवाजी येसणे व अन्य मान्यवर.

आजरा हायस्कूलचे यश
आजरा : येथील जनता एज्युकेशन सोसायटी संचालित आजरा हायस्कूलने एनएमएमएस परीक्षेत यश संपादन केले. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षेत प्रशालेतील ८० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या पैकी ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले. प्रत्येक विद्यार्थाला एक हजार प्रतिमहिना रक्कम मिळणार आहे. त्यामुळे या शाळेतील यशस्वी विद्यार्थांना चार वर्षांत नऊ लाख ६० हजार इतकी रक्कम मिळणार आहे, असे यश मिळविणारी आजरा तालुक्यातील ही एकमेव शाळा ठरली. विद्यार्थ्यांना गणित विषयाचे विभागप्रमुख एस. आर. कांबळे, एस. बी. पाटील (बद्घिमता), आर. पी. केसरकर (विज्ञान), बी. पी. पाटील (इतिहास), एम. एस. कांबळे (भूगोल) यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी, उपाध्यक्ष विलास नाईक, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, सचिव रमेश कुरुणकर मुख्याध्यापक शिवाजी येसणे, उपमुख्याध्यापक बी. एम. दरी, पर्यवेक्षक एस. पी. होलम यांचे प्रोत्साहन मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93345 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..