गडहिंग्लजमध्ये बुधवारी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजमध्ये बुधवारी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
गडहिंग्लजमध्ये बुधवारी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

गडहिंग्लजमध्ये बुधवारी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

sakal_logo
By

गडहिंग्लजमध्ये बुधवारी
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
गडहिंग्लज, ता. ४ : येथील पंचायत समितीचा शिक्षण विभाग व साधना हायस्कूलतर्फे ४९ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन बुधवारी (ता. ७) होणार आहे. साधना हायस्कूलमध्ये दिवसभर प्रदर्शन चालेल. तंत्रज्ञान आणि खेळणी विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे.
सकाळी साडेदहाला प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते उद्‍घाटन होईल. साधना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. उच्च प्राथमिक विभागाचे उद्‍घाटन गटविकास अधिकारी शरद मगर, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे उद्‍घाटन तहसीलदार दिनेश पारगे, माध्यमिक अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य विभागाचे उद्‍घाटन मुख्याधिकारी स्वरूप खारगे, प्राथमिक अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य व प्रयोगशाळा सहायक-परिचर निर्मित शैक्षणिक साहित्य विभागाचे उद्‍घाटन पोलिस उपाधीक्षक राजीव नवले यांच्या हस्ते होणार आहे.
दुपारी चारला ‘शिक्षण भारती’चे अध्यक्ष दादासाहेब लाड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होईल. साधनाचे सचिव जे. बी. बारदेस्कर अध्यक्षस्थानी असतील. माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, उपशिक्षणाधिकारी भीमराव टोणपे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी एन. बी. हलबागोळ, विस्तार अधिकारी आर. आर. कोरवी, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेश कोळकी यांची प्रमुख उपस्थिती आहे. कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93356 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..