रत्नागिरी-गणपतीपुळेतील 50 मीटरचा समुद्र रेड झोन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-गणपतीपुळेतील 50 मीटरचा समुद्र रेड झोन
रत्नागिरी-गणपतीपुळेतील 50 मीटरचा समुद्र रेड झोन

रत्नागिरी-गणपतीपुळेतील 50 मीटरचा समुद्र रेड झोन

sakal_logo
By

- rat4p9.jpg-
47674
रत्नागिरी ः गणपतीपुळे येथे पोहण्यासाठी धोकादायक भागावर लावण्यात आलेल्या लाल रिबीन.

rat4p10.jpg-
47689
रत्नागिरी ः पोलिस, होमगार्डसह जीवरक्षक या भागात पेट्रोलिंग करताना.


५० मीटरचा समुद्र ‘रेड झोन’
---
पोलिसांची कार्यवाही; पर्यटकांना पोहण्यास मनाई
रत्नागिरी, ता. ४ ः आज आणि पाच दिवसांपूर्वी गणपतीपुळे किनारी बुडणाऱ्‍या पर्यटकांना स्थानिकांनी वाचविले. मात्र, पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी गणपतीपुळे पोलिस चौकीच्या मागील बाजूस किनाऱ्‍यावरील ५० मीटर भाग रेड झोन ठरविण्यात आला आहे. या ठिकाणी पर्यटकांना पोहण्यासाठी मनाई केली असून, गृहरक्षक दल व पोलिसांसह जीवरक्षकांची करडी नजर येथे असणार आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी पर्यटकाला गणपतीपुळे किनाऱ्‍यावरील स्थानिक व्यापाऱ्‍याने जीव धोक्यात घालून वाचविले होते. सुमारे एक तासाहून अधिक काळ हा थरार सुरू होता. आजही सांगलीच्या दोन पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचविले. पावसाळी वातावरणामुळे समुद्राच्या पाण्याला करंट असून, किनारी भागात लाटांचा जोर अधिक आहे. पर्यटकांनाही सुरक्षिततेसाठी आवाहन केले जाते; परंतु पर्यटक त्याकडे कानाडोळा करतात. गणपतीपुळे पोलिस चौकीच्या मागील बाजूस पाण्यात चाळ (खड्डा) तयार होत आहे. भरती-ओहोटीच्या कालावधीत ही परिस्थिती निर्माण होते. त्यात पोहणारा पर्यटक सापडला की तो खोल समुद्राकडे ओढला जातो.
सध्या पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने जयगड पोलिस ठाण्यातर्फे चाळ निर्माण होणारा परिसर पोहण्यास धोकादायक म्हणून ‘रेड झोन’ जाहीर केला आहे. सुमारे ५० मीटर हा भाग असून, तेथे पर्यटकांनी पोहण्यास जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले. ‘रेड झोन’ दर्शविण्यासाठी लाल रिबीन बांधून ठेवण्यात आली आहे. तेथे दिवसभरात गृहरक्षक दलाचे दोन जवान नियुक्त केले असून, पोलिसांनी पेट्रोलिंगही सुरू केले. तेथे पोहायला जाण्यास कोणी हट्ट करीत असेल, तर त्याची माहिती पोलिसांना कळवा, अशा सूचना जीवरक्षक व सागररक्षकांना केल्या आहेत. गर्दी वाढली तर जेट स्कीचा वॉचही ठेवला जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.
-------------------
चौकट
जीवरक्षक वाढविण्याची गरज
गणपतीपुळे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून, याठिकाणी वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेतल्यावर ते समुद्रात पोहण्यासाठी उतरतात. त्यांच्या सुरक्षेसाठी पूर्वी ग्रामपंचायतीने दहा जीवरक्षकांची नियुक्ती केली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यात कपात केली. सध्या चारच जीवरक्षक येथे आहेत. मानधनाअभावी जीवरक्षकांची संख्या कमी करण्यात आली होती. भविष्यात गर्दी वाढणार असल्याने जीवरक्षक वाढविण्याची मागणी केली जात आहे.
----------------------
कोट
समुद्र खवळलेला असून, पावसामुळे किनाऱ्‍यावरील विशिष्ट परिसरात खड्डा तयार होतो. सध्या त्या भागात पर्यटकांना पोहण्यास मनाई केली आहे. याची अंमलबजावणी पावसाळा संपेपर्यंत म्हणजेच ऑक्टोबरपर्यंत केली जाईल.
- जयदीप कळेकर, सहायक पोलिस निरीक्षक

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93365 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..