आजपासून देखावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजपासून देखावे
आजपासून देखावे

आजपासून देखावे

sakal_logo
By

देखावे आजपासून होणार खुले
.................
दोन वर्षांनंतर आनंदाला येणार उधाण; ऐतिहासिक, पौराणिक देखाव्यांची पर्वणी
.................
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः दोन वर्षे कोरोनाच्या लाटेमुळे उत्साहावर मर्यादा आलेल्या गणेशोत्सव मंडळांचा या वर्षीचा गणेशोत्सव धूमधडाक्यात सुरू असून, यंदा गणेशोत्सवानिमित्त मंडळांनी तयार केलेले सजीव देखावे उद्या (ता. ५)पासून पाहण्यासाठी खुले होत आहेत. देखाव्याच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची मोठी परंपरा कोल्हापूरला आहे, त्यातूनच ऐतिहासिक, पौराणिक आणि सद्य सामाजिक, राजकीय स्थितीवर आधारित देखाव्यांची पर्वणी कोल्हापुरात सलग तीन दिवस पाहायला मिळेल.
घरगुती गौरी-गणपतीच्या विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी बहुतांश देखावे सुरू होतात. पण, काही मंडळांनी उद्यापासूनच देखावे सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. काही मंडळांनी देखाव्याला फाटा देत परराज्यांतील मोठी मंदिरे किंवा ऐतिहासिक स्थळांची प्रतिकृती साकारली आहे. काही मंडळांनी आकर्षक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली असून, या प्रतिकृतीही यंदाच्या गणेशोत्सवाचे आकर्षण असतील. महिनाभर या देखाव्यांच्या तयारीत कार्यकर्ते गुंतले आहेत. या देखाव्याच्या रेकॉर्डिंगसाठी कोल्हापुरात स्टुडिओतही महिनाभरापासून लगबग सुरू होती.

पेठांत, बावड्यात
सजीव देखाव्यांची परंपरा
मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, उत्तरेश्‍वर पेठ, जुना बुधवार पेठ, कसबा बावडा परिसरात सजीव देखावे सादर करण्याची मोठी परंपरा आहे. ऐतिहासिक, पौराणिक व सद्य राजकीय सामाजिक स्थितीवर भाष्य करणारे देखावे सादर करून या परिसरातील मंडळांकडून समाजप्रबोधनाचे काम सुरू आहे. ताराबाई रोडवरील मित्रप्रेम तरुण मंडळाचा देखावा आजच सुरू झाला. लेटेस्ट तरुण मंडळाच्या ‘जालियनवाला बाग’ देखावा उद्यापासून नागरिकांना पाहण्यासाठी खुला होणार आहे. सलग चार दिवस हे देखावे नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहतील.

उद्यमनगर, शाहूपुरीत तांत्रिक देखावे
उद्यमनगर परिसरात तांत्रिक देखावे, तर राजारामपुरीत आकर्षक रोषणाईसह विविध मंडळांनी देखावे सादर केले आहेत. शाहूपुरीतही यंदा तांत्रिक देखावे लोकांचे लक्ष वेधून घेतील. देखावे पाहण्यासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन काही मोठ्या मंडळांसह पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे.

.................
महागणपतीचा महाप्रसाद
शिवाजी चौकातील शिवाजी चौक तरुण मंडळातर्फे उद्यापासून सलग पाच दिवस महागणपतीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
उद्या सायंकाळी उद्योगपती दिलीपशेट पटेल यांच्या हस्ते प्रसाद वाटप सुरू होईल. हा प्रसाद घरी नेता येईल, अशी व्यवस्था केली आहे. किमान एक लाख लोकांना प्रसाद वाटपाचे नियोजन आहे. मंडळातर्फे मंगळवारी (ता. ६) सकाळी सातला अथर्वशीर्ष पठण होईल.
................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93379 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..