लंम्‍पीस्कीन त्रस्त जनावरांची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लंम्‍पीस्कीन त्रस्त जनावरांची पाहणी
लंम्‍पीस्कीन त्रस्त जनावरांची पाहणी

लंम्‍पीस्कीन त्रस्त जनावरांची पाहणी

sakal_logo
By

47876
लम्‍पी त्वचारोगत्रस्त जनावरांची
‘गोकुळ’च्या पदाधिकाऱ्याकडून पाहणी

कोल्‍हापूर, ता. ४ : अतिग्रे, चौगलेवाडी (ता. हातकणंगले) येथील दूध उत्पादकांच्या  जनावरांना ''लम्‍पीस्कीन त्‍वचारोग’ची लागण झाली आहे. याची पाहणी ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्‍वास पाटील, संचालक डॉ. सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व वैद्यकीय अधिकारी यांनी पाहणी केली. 
श्री. पाटील म्हणाले, लंम्‍पीस्कीन हा रोग जनावरांच्या त्वचे संबंधित आजार आहे. हा संसर्गजन्य रोग आहे. त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. अतिप्रमाणात लागण झालेले जनावर दगावण्याची शक्यता आहे. यामुळे दूध उत्पादकांनी आजारी जनावरे व इतर जनावरे एकाच गोट्यातून बाजूला करावीत. दूध उत्पादकांनी आजारग्रस्त जनावरांची सेवा करताना हात मोजे वापरावेत. हा आजार रोखण्यासाठी ‘गोकुळ’चे वैद्यकीय पथक तयार करून उपययोजना त्या दूध उत्पादकांच्या गोठ्यावर जाऊन उपचार केले जाणार आहेत. तसेच संघाशी संलग्न सर्व दूध संस्थांना या त्वचारोगाबद्दल माहिती व त्यावर उपाय असलेले परिपत्रक संघाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत संस्थांना पाठवले जाणार आहे.
अतिग्रे येथील चौगलेवाडी येथील अजित विलास चौगुले, दादा चौगुले, आदित्य काकासो चौगुले, दिनकर रामू पाटील, उदय श्रीधर पाटील, सखाराम गोपाळ मुसळे, काकासो कल्लाप्पा चौगुले, चंद्रशेखर माणिक पाटील या दूध उत्पादकांच्या गोठ्यावर जाऊन जनावरांची पाहणी केली. यावेळी पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. यू. व्ही. मोगले, सहा. व्यवस्थापक डॉ. पी. व्ही. दळवी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, दूध संकलन अधिकारी आर. एन. पाटील, विस्तार पर्यवेक्षक विक्रम पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93414 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..