नियामक मंडळच रद्द करण्याचा ठराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नियामक मंडळच रद्द करण्याचा ठराव
नियामक मंडळच रद्द करण्याचा ठराव

नियामक मंडळच रद्द करण्याचा ठराव

sakal_logo
By

नियामक मंडळच रद्द करण्याचा ठराव
क्रांती पतसंस्था वार्षिक सभा; दहा लाखांवर निव्वळ नफा
दानोळी, ता. ५ ः कोथळी येथील क्रांती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कोथळी येथील कल्लेश्वर हॉलमध्ये झाली. सभेमध्ये नियामक मंडळच रद्द करण्याचा एकमुखी ठराव केला. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन देवगोंडा पाटील होते.
अहवाल वाचन करताना संचालक संजय नांदणे यांनी संस्थेस २९ लाख ५० हजार १५८ रुपये ढोबळ नफा झाला असून १० लाख १९ हजार ७०८ रुपये निव्वळ नफा झाल्याचे सांगितले. विषय पत्रिकेचे वाचन संस्थेचे व्यवस्थापक सुहास बुर्ले यांनी केले. अकरा विषय सभेपुढे ठेवले होते.
क्रांती सेवा सोसायटी, कोथळी सेवा सोसायटी, क्रांती पतसंस्था, सर्वोदय पतसंस्था या संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याबद्दल, तसेच नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालकांचा सत्कार केला. स्वच्छ स्पर्धेत आदर्श विद्यालयाचा क्रमांक आल्याबद्दल मुख्याध्यापक अनिल बोरगावे यांचाही सत्कार केला. महावीर पतसंस्थेचे संचालक गौतम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच भरतेश खवाटे, ज्येष्ठ नेते धनगोंडा पाटील, ‘जवाहर साखर’चे संचालक गौतम इंगळे, महावीर पतसंस्थेचे बाहुबली इसराना, प्रकाश पुजारी, चंद्रकांत शिरोटे, राजेंद्र घाटगे, कुमार सुतार, सुरगोंडा पाटील आदी उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप मगदूम यांनी स्वागत केले. संस्थेचे संचालक राजेंद्र नांदणे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. क्रांती संचालक अशोक पुजारी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93496 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..